

सरकारी कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेबीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल्स पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सेबी लवकरच यंग प्रोफेशनल प्रोग्राम सुरु करणार आहे. यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे.
सेबीमध्ये चांगल्या पदावर काम करण्याची संधी आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्यांना महिन्याला ७० हजार रुपये पगार मिळणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन १० फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे.
सेबीमधील यंग प्रोफेशनल प्रोग्राममध्ये इंडियन कॅपिटल मार्केट आणि त्यासंबंधित काम शिकण्याची संधी मिळणार आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. यामधून करिअर करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. याचसोबत कामाचा अनुभवदेखील मिळणार आहे.
सेबीमधील ही नोकरी वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जाणार आहे. सिक्युरिटी मार्केट ऑपरेशन्स, लॉ, रिसर्च, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी यामध्ये ही भरती होणार आहे. एकूण ९१ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पात्रता काय?
यंग प्रोफेशनल (सिक्युरिची मार्केट ऑपरेशन्स) पदासाठी मॅनेजमेंट फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत कामाचा १ वर्षांचा अनुभव असायला हवा. यंग प्रोफेशनल (लॉ) पदासाठी बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत १ वर्षांचा अनुभव असावा. रिसर्च विभागातील नोकरीसाठी मॅनेजमेंट फायनान्स, इकोनॉमिक्स, फायनान्शियल इकोनॉमिक्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
सेबीमधील या नोकरीसाठी www.sebi.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. १० फेब्रुवारीपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२६ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सेबीमधील या पदासाठी ७०,००० रुपये पगार मिळणार आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, प्रिलियमरी इंटरव्ह्यू, फायनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.sebi.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.