IMU Recruitment 2024 : शिक्षण पूर्ण झालंय? नोकरी शोधताय? IMU मध्ये सुरु आहे भरती; कसा कराल अर्ज

Government Job Alert : भारतीय मेरीटाईम विद्यापीठाने पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज सुरू झाले असून आवश्यक पात्रता, फी, निवड परीक्षा आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
 Government Job Alert
IMU Recruitment 2024 SAAM TV
Published On

भारतीय मेरीटाईम विद्यापीठाने सहाय्यक आणि सहाय्यक मेरीटाईम पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. नोंदणी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या.

किती पदे भरली जातील?

या भरती मोहिमेद्वारे एकूण २७ पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यापैकी १५ पदे सहाय्यक तर १२ पदे सहाय्यक (वित्त) विभागासाठी आहेत. या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी भारतीय मेरीटाईम विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. www.imu.edu.in

पात्रता काय?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. या दोन्ही पदांसाठी ३५ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

  • सहाय्यक पद - कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असणे महत्त्वाचे

  • सहाय्यक वित्त पद - वाणिज्य, गणित किंवा सांख्यिकी या विषयात पदवी घेतलेले उमेदवार

किती फी?

  • जनरल श्रेणीसाठी शुल्क १००० रुपये

  • एससी, एसटी प्रवर्गासाठी शुल्क ५०० रुपये

  • महिला उमेदवार आणि पीएच उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

 Government Job Alert
Central Railway Recruitment : मध्य रेल्वेत २,४२४ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू, दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

निवड कशी होईल?

  • संगणकावर आधारित भरती परीक्षा

  • कागदपत्रांची पडताळणी

  • वैद्यकीय तपासणी

  • हे सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.

शेवटची तारीख काय?

या पदांसाठी अर्ज ९ ऑगस्टपासून सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२४ आहे.

 Government Job Alert
Government Job: १०वी- १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com