HPCL Recruitment: इंजिनियर झालात? हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. २३४ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहेत.
HPCL Recruitment
HPCL RecruitmentSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये २३४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ जानेवारी २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही hindustanpetroleum.com वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (HPCL Recruitment 2025)

HPCL Recruitment
Anganwadi Jobs: अंगणवाडीत बंपर भरती! ५ वी ते १२ वी पास महिला करु शकतात अर्ज; वाचा संपूर्ण प्रोसेस

एचपीसीएलमध्ये विविध विभागांमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन आणि केमिकल विभागात भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे केली जाणार आहे. यानंतर ग्रुप डिस्कशन, स्किल टेस्ट आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवारांनी B.E/ B.tech केलेले असावे. याचसोबत संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असावा.

HPCL Recruitment
Government Job: केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी; पगार १,८०,००० रुपये; अशा पद्धतीने करा अर्ज

या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.अर्ज करताना तु्म्हाला ५९० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला hindustanpetroleum.com या वेबसाइटवर जावे.

त्यानंतर करिअर सेक्शनवर जाऊन भरती नोटिफिकेशनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरायची आहे. अर्ज फीदेखील भरायची आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

HPCL Recruitment
Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com