Government Jobs: खूशखबर! वयाची तिशी ओलांडल्यानंतरही मिळेल सरकारी नोकरी; कुठे -कुठे आहे संधी जाणून घ्या

Government Job Age Limit : वयाच्या तिशीनंतर सरकारी नोकरी मिळू शकते का? बँकिंग, रेल्वे, शिक्षण, राज्य लोकसेवा आयोग (State PSCs) आणि न्यायपालिका या क्षेत्रांतील संधी तसेच वयोमर्यादेबाबतचे नियम याविषयी माहिती जाणून घ्या.
Government Job Age Limit
government jobs available after age 30 in Indiasaam tv
Published On
Summary
  • वयाची ३० वर्षे ओलांडली म्हणजे सरकारी नोकरीच्या सर्व संधी संपतात, हा समज चुकीचा

  • सरकारी भरतीतील कमाल वयोमर्यादा पद, विभाग आणि भरती संस्थेनुसार बदलते.

  • बँकिंग, रेल्वे, शिक्षण, UPSC आणि राज्य PSC अशा विविध क्षेत्रांमध्ये तिशीनंतरही काही संधी उपलब्ध

सरकारी नोकरीची तयारी केवळ २१ ते २५ वयोगटातच करता येते, असा अनेकांचा चुकीचा समज असतो. पण हे पूर्णपणे खरं नाहीये. हो, तुम्ही वयाची तिशी ओलांडली असेल तरीही सरकारी क्षेत्रात करिअर घडवण्याचे मार्ग तुमच्यासाठी बंद झालेले नाहीत. भारतातील अनेक सरकारी विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ३० ते ४० वर्षे इतकी असते.

याशिवाय सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्ग (OBC, SC, ST, PwD) आणि महिलांना वयोमर्यादेत सवलत दिली जाते. त्यामुळे जाणून घेऊ की, वयाच्या ३० वर्षांनंतर विविध क्षेत्रांत तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबद्दल.

वयाच्या ३० वर्षांनंतर उपलब्ध असलेल्या प्रमुख सरकारी नोकऱ्या कोणत्या?

राज्य लोकसेवा आयोग (State PSC) परीक्षा:

उत्तर प्रदेश (UPPSC), बिहार (BPSC) आणि राजस्थान (RPSC) यांसारख्या अनेक राज्यांमध्ये, प्रशासकीय सेवांसाठी अर्ज करण्याकरिता कमाल वयोमर्यादा ३५ ते ४० वर्षे इतकी असते.

Government Job Age Limit
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारासंदर्भात सरकारचा नवा आदेश; 'ही' काम करा नाहीतर अडकेल पगार

शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्या: (Teaching Jobs):

जर तुम्ही बी.एड. (B.Ed.) पूर्ण केले असेल किंवा CTET, TET अथवा UGC-NET परीक्षा उत्तीर्ण केली असेल, तर तुम्ही शालेय शिक्षक, KVS किंवा NVS मधील पदे, तसेच सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) अशा पदांसाठी अर्ज करू शकता. या पदांसाठी वयोमर्यादा बऱ्यापैकी लवचिक असते.

रेल्वे आणि बँकिंग क्षेत्रे: (Railways & Banking)

बँकांमधील 'स्पेशालिस्ट ऑफिसर' (SO) आणि रेल्वेमधील विविध तांत्रिक व अ-तांत्रिक (NTPC) पदांसाठी ३० ते ३५ वयोगटातील उमेदवार पात्र असतात.

न्यायिक सेवा:(Judicial Services):

ज्या उमेदवारांनी कायद्याची पदवी (LLB) पूर्ण केली आहे, त्यांना वयाच्या ३५ ते ४० वर्षांपर्यंत दिवाणी न्यायाधीश (Civil Judge) आणि इतर न्यायिक पदांवर काम करण्याची संधी असते.

Government Job Age Limit
NCPA कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; पगारात भरघोस वाढ, वर्षाला ५० हजारांचा बोनस

आरोग्य विभाग (Health Department):

वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधरांसाठी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांसारख्या पदांवरील भरतीसाठी कमाल वयोमर्यादा अनेकदा ३५ ते ४० वर्षे इतकी आहे.

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, CGL मध्ये असते संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC CGL) अंतर्गत काही विशिष्ट पदांसाठी (उदा. सांख्यिकी अधिकारी/Statistical Officer) वयोमर्यादा ३२ वर्षांपर्यंत असते.

Government Job Age Limit
महाप्रसाद,भंडारा आयोजनासाठी परवानगी घ्यावी लागणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; हे ७ नियम जरूर वाचा

वयाच्या ३० वर्षांनंतर तयारी करण्याचे काय असतात फायदे:

परिपक्वता आणि शिस्त: ३० वर्षांवरील उमेदवारांमध्ये अधिक गांभीर्य, ​​वेळेचे उत्तम नियोजन करण्याची क्षमता आणि आपल्या ध्येयांविषयी स्पष्टता दिसून येते. जर तुम्ही याआधी खासगी क्षेत्रात नोकरी केली असेल, तर तुमचा कामाचा अनुभव आणि कामाप्रती असलेली निष्ठा स्पर्धा परीक्षांच्या मुलाखती व मुख्य लेखी परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतात.

वयाच्या ३० वर्षांनंतरची योग्य तयारीची रणनीती

अधिकृत सूचनांकडे बारकाईने लक्ष द्या: प्रत्येक भरती प्रक्रियेची अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा आणि आपली पात्रता व वयोमर्यादा तपासून घ्याव्यात.

अभ्यासक्रम आणि मूलभूत संकल्पनांवरील पकड मजबूत करा: सामान्य अध्ययन (General Studies), तर्कक्षमता (Reasoning), गणित आणि भाषा (हिंदी/इंग्रजी) या विषयांवर भक्कम प्रभुत्व मिळवा.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवा:

परीक्षेचे स्वरूप आणि गुणदान पद्धती समजून घेण्यासाठी गेल्या ५-१० वर्षांच्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा.

अभ्यास कसा कराल?: दररोज ५-६ तास अभ्यास आणि सराव परीक्षा (मॉक टेस्ट्स) यांचा समावेश असलेली शिस्तबद्ध दिनचर्या हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com