महाप्रसाद,भंडारा आयोजनासाठी परवानगी घ्यावी लागणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; हे ७ नियम जरूर वाचा

Maharashtra FDA Announces New Rules For Bhandara : महाप्रसाद, भंडारा आणि इतर सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांवर FDAची नजर असणार आहे. भंडाऱ्यासाठी आयोजित करताना किमान 7 दिवस आधी स्थानिक FDA अधिकाऱ्याला माहिती देणे आवश्यक आहे.
MAHAPRASAD BHANDARA RULES 7-DAY PRIOR FDA INTIMATION REQUIRED IN MAHARASHTRA
MAHAPRASAD BHANDARA RULES 7-DAY PRIOR FDA INTIMATION REQUIRED IN MAHARASHTRA
Published On

संजय गडदे, मुंबई

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी नवा निर्णय जाहीर केलाय. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सामूहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत असाल तर अन्न आणि औषध प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. तसेच तसेच केटररने स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारा माल कुठून खरेदी केला याचीही माहिती द्यावी लागणार आहे.

MAHAPRASAD BHANDARA RULES 7-DAY PRIOR FDA INTIMATION REQUIRED IN MAHARASHTRA
दुचाकी चालकांसाठी सरकारची मोठी ऑफर; दररोज होणार कमाई, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल

अन्न आणि औषध प्रशासनातकडून महाप्रसाद, भंडाऱ्यामधील अन्नाची गुणवत्ता तपासली जाणार आहे. FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सण-उत्सवांच्या काळात होणारी अन्नातील भेसळ रोखण्यासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केलाय. सणांच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा आणि मटण-चिकनची मागणी अनेक पटींनी वाढते. त्यामुळे भेसळीची शक्यताही दाट असते. ही भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून वर्षभराचे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. वर्षातील सर्व सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण करण्यात आलंय.

MAHAPRASAD BHANDARA RULES 7-DAY PRIOR FDA INTIMATION REQUIRED IN MAHARASHTRA
डीजेवरून पुण्यात दणदणाट, दुसरीकडं नागपुरात आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी थेट बंदी आदेश काढला

राज्यातील नागरिकांना सणांच्या काळात सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. ईद, होळी आणि बकरी ईदपासून गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळीपर्यंत वर्षभर साजऱ्या होणाऱ्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची तपासणी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी FDA ने व्यापक यंत्रणा तयार केलीय.

काय म्हणाले तुकाराम मुंढे?

नव्या नियमांबाबत सांगताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, सणांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी अन्न मिळाले पाहिजे. यासाठी महाराष्ट्रात ‘सेफ फूड अँड सेफ ड्रग’ ही संकल्पना राबवली जाणार आहे , सणांच्या काळात अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. याआधी विविध सणांच्या काळात अन्न सुरक्षा नियमांनुसार कारवाई केली जात असायची.

मात्र, संपूर्ण वर्षभरासाठी सणनिहाय आणि पद्धतशीर नियोजन नव्हते. त्यामुळे आज ३ सप्टेंबरपासून वर्षभरातील सण-उत्सव लक्षात घेऊन अन्न सुरक्षा कारवाईचा विशेष ॲक्शन प्लॅन लागू केला जातोय. या योजनेत कोणत्याही एका धर्माच्या सणाला वेगळे नियम नसणार आहेत.

असे असेन वार्षिक कॅलेंडर आणि तीन स्तरांवरील वर्गीकरण

प्रथम श्रेणी (राज्यव्यापी): गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष पूर्वसंध्या.

द्वितीय श्रेणी (प्रादेशिक): मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.

तृतीय श्रेणी (स्थानिक): स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस.

चार टप्प्यांत होणार धडक कारवाई

कारवाईची प्रक्रिया ही सणाच्या 21 दिवस आधी सुरू होईल आणि सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत सुरू राहील. यात-

पहिला टप्पा : हाय-रिस्क अन्नाचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना देणे.

दुसरा टप्पा: गिरण्या, घाऊक मंड्या आणि वाहतुकीवर लक्ष. पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणी.

तिसरा टप्पा : सणाच्या दिवशी विशेष भरारी पथकांद्वारे प्रत्यक्ष ठिकाणांची सरप्राईज तपासणी केली जाईल.

चौथा टप्पा : दोषींवर खटले दाखल करणे आणि अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com