दुचाकी चालकांसाठी सरकारची मोठी ऑफर; दररोज होणार कमाई, ड्रायव्हिंग लायसन्सबाबत घेतला मोठा निर्णय

Bike Taxi : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यांना एक खास आवाहन केलंय. प्रत्येक राज्यातील सरकारनं गडकरींच्या आवाहनाची अंमलबजावणी केली तर खासगी दुचाकी मालकांना कामाईचं साधन मिळणार आहे. बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याची परवानगी केंद्राने दिलीय.
Bike Taxi :
Nitin Gadkari asks states to allow private bike taxi servicessaam tv
Published On
Summary
  • राज्यांना खासगी दुचाकी मालकांसाठी बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचे आवाहन

  • केंद्र सरकारने बाईक टॅक्सी सेवेला मंजुरी दिल्याची माहिती

  • बाईक टॅक्सीला परवानगी मिळाल्यास दुचाकी मालकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय

तुमच्याकडे बाईक किंवा स्कूटर आहे का? हो, तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे, शिवाय तुम्हाला आर्थिक लाभ करून देणारी आहे. तुम्ही तु्मच्या बाईकच्या मदतीने तुम्ही दररोज चांगले उत्पन्न मिळवू शकता. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील दुचाकी मालकांनासाठी खूशखबर दिलीय.

Bike Taxi :
8th Pay Commission : 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार? NC-JCM ने सांगितलं सत्य

केंद्रीय मंत्री गडकरींनी राज्यांना आवाहन केलंय, प्रत्येक राज्यातील सरकारनं आपल्या राज्यातील खासगी दुचाकी मालकांना 'बाईक टॅक्सी' सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी. केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे, परंतु वाहतूक हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने काही राज्यांनी याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही.

गडकरी यांच्या मते, या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि सुमारे ८ कोटी लोकांना उपजीविकेचे साधन मिळेल. रस्ते सुरक्षेबाबत बोलताना गडकरींनी 'मोटार वाहन कायद्या'त सुधारणा करण्याच्या योजनांची रूपरेषा मांडली. गडकरींनी सांगितले की, वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'निगेटिव्ह पॉइंट सिस्टम' (नकारात्मक गुण पद्धत) तयार करण्यात आलीय.

Bike Taxi :
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

यानुसार, प्रत्येक उल्लंघनासोबत चालकाच्या नोंदीमध्ये नकारात्मक गुण जोडले जातील. जर गुण एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाले, तर वाहन चालवण्याचा परवाना निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द केला जाईल. चालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि रस्ते अपघात रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

ट्रक चालकांसाठी खास योजना

मंत्री गडकरी यांनी कामगार वर्गासाठी एक खास योजना सुरू केली आहे. महामार्ग आणि खाणकाम प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेले चालक, बांधकाम कामगार आणि उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रातील कर्मचारी यांच्यासाठी 'सुरक्षा' नावाचा प्रायोगिक एक योजना सुरू केलीय. या उपक्रमांतर्गत, चालक आणि कामगारांना मोफत नेत्र तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हा प्रकल्प महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग-४४ (NH-44) वरील नागपूर-कामठी पट्टा आणि चंद्रपूरचा खाणकाम पट्टा या परिसरातील १५० किलोमीटरच्या परिघात राबविला जात आहे. याच्या पहिल्या टप्प्यात १०,००० लोकांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर ही व्याप्ती वाढवून त्यात दहा लाख चालक आणि कामगारांचा समावेश केला जाईल. चालकांचे उत्तम आरोग्य राहवे, यात त्यांची दृष्टी चांगली असावी. हा रस्ते सुरक्षेतील एक थेट आणि अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com