Government Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी; महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (महावितरण) कार्यालयात भरती सुरु आहे.

महावितरणच्या वर्धा कार्यालयात सध्या भरती सुरु आहे. या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ५६ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे. (Mahavitaran Job)

Government Job
Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

महावितरणमध्ये अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन, तारतंत्री, कोपा (COPA) पदासाठी ही भरती केली जाणार आहे. इलेक्ट्रिशियनसाठी २२ पदे रिक्त आहेत. वायरमन पदासाठी २२ पदे रिक्त तर कोपासाठी १२ पदे रिक्त आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून १०वी आणि आयटीआय पास असावे. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. वर्धा येथील कार्यालयात ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी तुम्ही www.mahadiscom.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Mahavitaran Recruitment)

Government Job
Airport Job: एअरपोर्टवर नोकरी करण्याची संधी; पात्रता पदवीधर; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

दिल्ली मेट्रो भरती (Delhi Metro Job)

सध्या दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. डीएमआरसीने मुंबईच्या प्रोजेक्टसाठी भरती केली जाणार आहे. सुपरवायजर, ज्युनिअर इंजिनियर, सेक्शन इंजिनियर, सीनियर सेक्शन इंजिनियर अशा पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे.

Government Job
Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत नोकरीची संधी; महिना ७२,००० पगार; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com