CISF मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १२वी पास उमेदवार करु शकतात अर्ज; मिळणार भरघोस पगार

CISF Recruitment 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा (CISF) दलात काम करणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

CISF Recruitment 2024
CISF Recruitment 2024Saam Tv
Published On

केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलात काम करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल फायरमन पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीची जाहिरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या पदासांठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.


CISF Recruitment 2024
WhatsApp Scam : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जॉइन होताच तरुणाला बसला 90 लाखांचा गंडा; नेमकं असं काय घडलं?

सरकारी विभागात नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकार अंतर्गत कॉन्स्टेबल फायरमन पदांसाठी 01130 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवार १२ वी उत्तीर्ण आणि वय 18 ते 23 असणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक वेतन असणार आहे.


CISF Recruitment 2024
Share Market Opening: आज शेअर मार्केटची शांत सुरुवात; निफ्टी २५००० च्या पार;कोणते शेअर्स तेजीत?जाणून घ्या

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन स्वरूपात सादर करायचे आहेत. संपूर्ण भारतातील लोक या भरतीसाठी आपले अर्ज सादर करू शकतात. ऑनलाईन पद्धताने अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 100रूपये शुल्क भरावे लागणार आहेत. तसेच राखीव प्रवर्गासाठी शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com