WhatsApp Scam : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जॉइन होताच तरुणाला बसला 90 लाखांचा गंडा; नेमकं असं काय घडलं?

Whatsapp Scam Of 90 Lakh Rupees: व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉइन होणे एका तरुणाला महागात पडलं आहे. एका ग्रुपमध्ये जॉइन झाल्यानंतर त्यांला ९० लाखांचा गंडा बसला आहे.
 WhatsApp Scam
WhatsApp ScamGoogle
Published On

सध्या व्हॉट्सअॅपवरुन फ्रॉड होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक लोक पैशांचा फ्रॉड करतात. असाच एक फ्रॉड मुंबईत झाला आहे. मुंबईतील या घटनेत एका व्हॉट्सअॅप युजरला चक्क ९० लाख रुपये गमवावे लागले आहेत. फ्रॉडर्सने एका व्यक्तीला चक्क ९० लाखांचा गंडा घातला आहे.

 WhatsApp Scam
Kisan Vikas Patra Scheme: ५ लाख रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काय आहे किसान विकास पत्र योजना?

मिडिया रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तीसोबत फ्रॉड झाला आहे त्यांना विदेशी एक्सपर्टच्या एका ग्रुपमध्ये अॅड केले होते.या ग्रुपमध्ये इन्वेस्टमेंटबाबत टीप्स दिल्या जात होत्या. या ग्रुपमध्ये जॉइन झाल्यानंतर त्या व्यक्तीला Institutional Trading Account ओपन करायला सांगितले. यासाठी प्ले स्टोरमधून एक अॅप डाउनलोड करायला सांगितले. त्यानंतर फ्रॉडर्संनी त्यांच्या अकाउंटमधून ९- लाख रुपये जमा करण्यास सांगितले.

यानंतर पीडित व्यक्तीला त्याला १५.६९ कोटींचा नफा झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्या युजरला संशय आला. त्याने त्याचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र, स्कॅम करणाऱ्या व्यक्तीने त्यांचे अकाउंट ब्लॉक केले आमि १.४५ कोटी रुपयांची मागणी केली. तोपर्यंत त्या युजरला आपल्यासोबत फ्रॉड झाला आहे, हे समजले होते. यातच त्या व्यक्तीला ९० लाखांता गंडा घालण्यात आला.

 WhatsApp Scam
RBI: तुमच्याकडे अजून २०००च्या नोटा आहेत? कुठे आणि कशा जमा करणार ? जाणून घ्या प्रक्रिया

व्हॉट्सअॅपवर होणाऱ्या फ्रॉडपासून कसे वाचावे?

  • कोणत्याही अनोळखी नंबरवरुन मेसेज आल्यास त्यातील लिंकवर क्लिक करु नये. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यास सांगितले तर त्यात गुंतवणूक करु नका.

  • जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर कोणताही फोन किंवा मेसेज आला त्यातून गुंतवणूक करण्यास सांगितले तर त्यावर विश्वास ठेवू नका.

 WhatsApp Scam
Atal Pension Scheme: रोज ७ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर ६०,००० रुपयांची पेन्शन मिळवा;काय आहे अटल पेन्शन योजना?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com