whatsapp New Feature : अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज होतील ब्लॉक; जाणून घ्या Whatsapp मधील नवीन अन् भन्नाट फिचर

WhatsApp's block messages from unknown account : नुकतंच व्हाट्सअपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन 'फिचर' आणलं आहे. काय आहे ते 'फिचर'? 'फिचर' चा वापर कसा करायचा ? ते आज जाणून घेऊयात.
WhatsApp's block messages from unknown account
whatsapp New FeatureSaam TV
Published On

आधुनिक जगात सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. अनेकजण Social Media apps चा वापर करतात. आपल्या मोबाईलमध्ये Gpay, Snapchat, Whatsapp, Instagram, Facebook अशा अनेक Apps असतात. यूजर्सच्या सेफ्टी करता वेळोवेळी apps featuresचे अपडेट्स येत असतात. नुकतंच व्हाट्सअपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन 'फिचर' आणलं आहे. काय आहे ते 'फिचर'? 'फिचर' चा वापर कसा करायचा ? ते आज जाणून घेऊयात.

WhatsApp's block messages from unknown account
Whatsapp Update: तुम्ही Whatsapp ग्रुप अ‍ॅडमिन आहात? जाणून घ्या तुम्हांला मिळालेला नवा अधिकार

सोशल मीडिया म्हंटल की, एकमेकांना संदेश पाठवणं, इतकंच मर्यादित नसून एकमेकांना ऑनलाईन Payment ची देवाण घेवाण केली जाते. एका क्लिक वर हवं तेव्हा आपल्या दूरच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करता येतात. अशा सोयीस्कर व्यवहारासाठी आणि यूजर्सची माहिती ही गोपनीय राहण्यासाठी सोशल मीडिया Apps वेगवेगळ्या safety features घेऊन येत असतो, WABetainfo च्या रिपोर्ट नुसार व्हॉट्सॲप लवकरच आपल्या यूजर्ससाठी नवीन फिचर घेऊन येत आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर चाचणीच्या टप्प्यात आहे. या नवीन फीचर्स मध्ये, अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज ब्लॉक करण्यास मदत करेल. युजर्सच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म ॲपला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी तसेच वापरकर्त्याची माहिती गोपनीय राहण्यास आणि चांगले संरक्षण करण्यासाठी हे नवं फीचर्स काम करेल.

या फिचर द्वारे सगळ्याच अनोळखी यूजर्सने पाठवलेले मेसेज ब्लॉक करता येत नाही. ठराविक मर्यादा ओलांडलेल्या अनोळखीने पाठवलेले सर्व संदेश ऑटोमॅटिकली ब्लॉक केले जातील. वापरकर्त्यांना धमक्या आणि स्पॅम संदेशांपासून सावध करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

इतकंच नव्हे तर, व्हॉट्सॲप अजून एका नवीन फिचरची चाचणी करत आहे. हे फिचर स्टेटस Related आहे. आता स्टेटस likes करता स्टेटसच्या टॅबवरील रिप्लाय बटणाच्या बाजूला ' हार्ट ' ईमोजी ( ♥️ ) दिसून येईल. म्हणजेच Instagram च्या स्टोरी लाईक्स प्रमाणे हे स्टेटस अपडेट्स असतील. याचबरोबर व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी आणखी भन्नाट नवनवं फीचर्स लवकरच घेऊन येणार आहे.

WhatsApp's block messages from unknown account
WhatsApp New Update: व्हॉट्सॲप रंगरूप बदलणार!; नवा अवतार पाहून तरुणाईचे भिरभिरतील डोळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com