WhatsApp New Update: व्हॉट्सॲप रंगरूप बदलणार!; नवा अवतार पाहून तरुणाईचे भिरभिरतील डोळे

WhatsApp New Update (Sep 2023) : लीक झालेल्या रिपोर्टमध्ये व्हॉट्सॲपच्या इंटरफेसची माहिती समोर आली आहे.
Whatsapp New Updates News
Whatsapp New Updates NewsSaam Tv
Published On

WhatsApp Interface Change :

२०२३ मध्ये व्हॉट्सअपमध्ये अनेक नवीन अपडेट करण्यात आले. आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअपने नवीन फीचर्सही आणले आहेत. जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं आणि इन्स्टन्ट मेसेजिंग ॲप WhatsApp. चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग सर्वांसाठी व्हॉट्सॲप हे बेस्ट ऑप्शन आहे.

व्हॉट्सॲपने सध्या आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत आहे. नवीन फीचर्ससह सध्या नव्या इंटरफेसवरही काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपच्या नव्या इंटरफेसमध्ये टॉप बार पांढरा करण्यात येणार आहे तर ॲपचे नाव हिरव्या रंगात पाहायला मिळेल. लीक झालेल्या रिपोर्टमध्ये व्हॉट्सॲपच्या इंटरफेसची माहिती समोर आली आहे.

Whatsapp New Updates News
Royal Enfield New Bullet 350 Launch: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! नव्या रंगात, नव्या ढंगात बुलेट 350 रिलॉन्च; बुकिंग सुरु

1. इंटरफेसमध्ये होणार बदल

Wabetainfoच्या लीक झालेल्या रिपोर्टनुसार Google Play Store वर उपलब्ध Android 2.23.18.18 साठी WhatsApp beta च्या नवीनतम अपडेटसह हा इंटरफेस नवीन युजर्सला मिळणार आहे. या यूजर इंटरफेसमध्ये व्हाईट टॉप बार असेल. तसेट फॉन्ट देखील बदलणार आहे. नवीन अपडेटनुसार हिरव्या रंगात दिसू शकते. या नव्या इंटरफेसचा स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे.

Whatsapp New Updates News
Detox Drink: असे बनवा डिटॉक्स वॉटर, सुटलेलं पोट आठवड्याभरात झरकन कमी होईल

2. हे बदल होतील

जुन्या लीक झालेल्या रिपोर्टमध्ये व्हॉट्सॲपच्या नव्या इंटरफेसचीही माहिती समोर आली आहे. तेव्हा पांढऱ्या टॉप बार दिसला असून त्याचा ॲप आयकॉन काळ्या रंगात होता. सध्या मिळालेल्या माहितीनुसार ॲपचे नवे आयकॉन हिरव्या रंगाच्या पर्यायामध्ये असू शकते. स्क्रीनशॉटबद्दल बोलायचे तर, व्हाइट टॉप आणि ग्रीन ॲप आयकॉनसह, काही चॅट फिल्टर देखील मिळणार आहेत. वापरकर्त्यांना नवीन इंटरफेसमध्ये अनरिड मॅसेज (Message), पर्सनल चॅट आणि इतर अनेक नवे फिल्टर मिळतील.

3. Whatsapp macOS प लाँच

मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने नुकतेच व्हॉट्सॲप मॅकओएस ॲप लॉन्च केले. यापूर्वी, कंपनीने विंडोज वापरकर्त्यांसाठी डेस्कटॉप ॲप लाँच केले आहे. या दोन्ही ॲप्सद्वारे, वापरकर्त्यांना चॅटसह व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करण्याची सुविधा मिळते आहे.

Whatsapp New Updates News
Google AI Tool Launch : Google चं भन्नाट AI टूल, भारतीयांसाठी हिंदी-इंग्रजीत सर्च करण्याची सुविधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com