Royal Enfield ने अखेर नवीन Bullet 350 लॉन्च केली आहे. या बुलेटची चाहते मागील वर्षभरापासून वाट पाहात होते. Royal Enfield ची ही मोटारसायकल हंटर 350 आणि क्लासिक 350 मधील मॉडेल असणार आहे.
हंटर 350 ही भारतातील रॉयल एनफिल्डच्या श्रेणीतील सर्वात बजेट-अनुकूल मोटरसायकल आहे. जाणून घेऊया मॉडेलची किमत व मायलेजबद्दल सविस्तर.
कंपनीने नवीन बुलेट 350 3 प्रकारात लॉन्च केली आहे. यामध्ये, बेस व्हेरिएंटची किंमत 1.73 लाख रुपयांपासून सुरू होते, जी सुरुवातीची आणि एक्स-शोरूमची किंमत आहे. याशिवाय, मिड-लेव्हल वेरिएंटची किंमत 1.97 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 2.15 लाख रुपये आहे. मिलिटरी, स्टँडर्ड आणि ब्लॅक गोल्ड अशी तीन प्रकारांची नावे आहेत.
यावेळी जुने इंजिन स्क्रॅप करुन नवीन रिफ्रेश इंजिन मिळू शकते. हे रिफ्रेश केलेले लाँग-स्ट्रोक इंजिन २०.२ बीएचपी पॉवर आणि २७ एनएम टॉर्क निर्माण करते. बुलेट 350 ला नवीन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. बाईकचे स्पेसिफिकेशनमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. बाइकला 135 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळेल.
कंपनीने आजपासून आपल्या नवीन बुलेट 350 चे बुकिंग सुरु केले आहे. नवीन बुलेट क्लासिक 350 पेक्षा 19,000 रुपये स्वस्त आहे परंतु हंटर 350 पेक्षा 24,000 रुपये अधिक महाग आहे. बाइकमध्ये सिंगल पीस सीट आहे. बाइकमध्ये 300 mm डिस्क ब्रेक आहे. आजपासून बुकिंग सुरु झाले असून त्याची डिलिव्हरी ३ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.