Whatsapp Update: तुम्ही Whatsapp ग्रुप अ‍ॅडमिन आहात? जाणून घ्या तुम्हांला मिळालेला नवा अधिकार

व्हॉट्सअ‍ॅपने फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची पद्धत अद्याप बदललेली नाही.
Whatsapp
Whatsappsaam tv

दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) ग्रुप अ‍ॅडमिनसाठी (WhatsApp Group Admin) एक नवीन फीचर आणण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला दिलासा मिळणार आहे. नव्या अधिकारामुळे त्याला त्याच्या ग्रुपवर हाेणार वाद विवाद टाळता येऊ शकतील. नव्या अधिकारात ग्रुप अ‍ॅडमिनला काही वेळेला ग्रुपवर पडणारे अश्लील किंवा आक्षेपार्ह संदेश डिलीट करता येणार आहेत. हा अधिकार ग्रुप अ‍ॅडमिनला लवकरच प्राप्त हाेईल असे WABetaInfo ने म्हटलं आहे. (WhatsApp Group admins will soon be able to delete messages for others)

व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfo नुसार जेव्हाही कोणताही अ‍ॅडमिन एखादा विशिष्ट मेसेज डिलीट करेल तेव्हा वापरकर्त्याला `हे अ‍ॅडमिनद्वारे डिलीट केले गेले' संदेश दिसेल. WABetaInfo ने ट्विटमध्ये तुम्ही एखाद्या ग्रुपचा (whatsapp group) अ‍ॅडमिन असल्यास तुमच्या ग्रुपमधील हवा ताे संदेश तुम्ही हटवू शकाल असे म्हटलं आहे. हे Android साठी WhatsApp बीटाने भविष्यातील अपडेट तयार केले आहे.

Whatsapp
Australian Open: 'नोव्हाक जोकोविच पाहत असेल'; डॅनिल मेदवेदेवचा राफेल नदालला इशारा

व्हॉट्सअ‍ॅप (whatsapp) ट्रॅकरने ट्विटसह (tweet) एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ग्रुप अ‍ॅडमिनने हटवलेला मेसेज Android वापरकर्त्यांसाठी कसा दिसेल हे त्यात दाखवले आहे. एकदा हे फिचर अपडेड झाले की ग्रुप अ‍ॅडमिनची चिंता मिटेल आणि काही वेळेला हाेणारी वादावादी मिटेल. व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅप आणि वेब व्हर्जनमध्ये वापरकर्त्याची खात्री करण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर (two-step verification) देखील विकसित करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची पद्धत अद्याप बदललेली नाही. परंतु WABetaInfo ने दावा केला आहे की (Android) डिव्हाइससाठी नवीन बीटा अपडेट व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याबद्दल संकेत देते.

Edited By : Siddharth Latkar

Whatsapp
IPL 2022 Auction: 10 संघांच्या रडारवर 10 'मोस्ट वाँटेड' खेळाडू
Whatsapp
Abhijeet Bichukale: 'सलमान खान अजून अंड्यात आहे'
Whatsapp
Juhi Chawla: 5G नेटवर्क प्रकरणात जुही चावलाचा १८ लाखांचा दंड झाला कमी; 'हे' करावं लागेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com