मेलबर्न : डॅनिल मेदवेदेवने (Daniil Medvedev) स्टेफानोस त्सित्सिपासचा (Stefanos Tsitsipas) आज पराभव करुन सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी डॅनिलला अंतिम सामन्यात राफेल नदालचा सामना करावा लागणार आहे. रशियाच्या जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकाच्या डॅनिलने सित्सिपासचा ७-६(५) ४-६, ६-४, ६-१ असा पराभव केला. (Daniil Medvedev to face Rafael Nadal bidding to become the all-time men’s singles Grand Slam leader in the Sunday’s final)
दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस सोडल्यानंतर मेदवेदेवने (Daniil Medvedev) चेअर अंपायरकडे ओरडले आणि गर्दीत त्याच्या वडिलांकडून टीप्स घेतल्याबद्दल त्सित्सिपासला (Stefanos Tsitsipas) सावध करण्याची मागणी केली. (rafael nadal latest marathi news)
मेदवेदेवने हा सेट गमावला. पाच मिनिटांचा ब्रेक घेतला आणि अधिक संयमाने ताे परतला. त्याने तिस-या सेटमध्ये सर्व्हिस ब्रेकचे गुणांत रूपांतर केले आणि शेवटचे पाच गेम जिंकले.
मी पुन्हा एकदा महान खेळाडूंविरुद्ध खेळणार आहे. 21व्या स्लॅमसाठी जाणाऱ्या एखाद्याविरुद्ध मी पुन्हा खेळणार आहे. मला वाटते की नोवाक कुठेतरी हे पाहत असेल. मी तयार आहे अशी प्रतिक्रिया मेदवेदेवने नदाल बराेबर हाेणा-या अंतिम लढती पुर्वी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.