Bank Job: नोकरी शोधताय? पंजाब अँड सिंध बँकेत भरती सुरु; पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

Punjab And Sind Bank : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे.
Bank Job
Bank JobSaam TV
Published On

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते.जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. पंजाब अँड सिंध बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या तरुणांना करिअरची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. पंजाब आणि सिंध बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत अप्रेंटिसशिप पदासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. १६ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Bank Job
Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

पंजाब अँड सिंध बँकेच्या भरतीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तिथे होमपेजवर रिक्रूटमेंट लिंक या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सर्वप्रथम तुम्ही स्वतः ला रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करावे लागेल. तुमची वैयक्तिक माहिती, सही, फोटो अपलोड करावा लागेल.

यानंतर पंजाब अँड सिंध बँकेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज शुल्क भरावे लागेल. त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.त्यानंतर तुम्ही या अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवा.या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Punjab And Sind Bank Job)

Bank Job
Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती (BMC Job)

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे. महानगरपालिकेत सिविल आणि मॅकेनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,४४,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Bank Job
Government Job: दहावी पास अन् महिना ८१ हजार पगार, इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com