Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; डिव्हायडर तोडून ट्रक कारला धडकला, ४ जणांचा मृत्यू

yamuna expressway Accident: ग्रेटर नोएडाजवळील यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
yamuna expressway Accident:
Yamuna Expressway truck car accident near Greater Noidasaam tv
Published On

ग्रेटर नोएडाजवळील यमुना एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. अनियंत्रित झालेला ट्रक दुभाजक तोडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जाणाऱ्या एका कारवर जाऊन आदळला. या अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घडला. अपघातामुळे यमुना एक्सप्रेसवेवर काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

ग्रेटर नोएडातील जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी एक भीषण अपघात झाला. नोएडाकडून आग्र्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले; त्यामुळे अनियंत्रित ट्रक रेलिंग तोडून आणि रस्त्याच्या पलीकडील बाजूला गेला. त्या मार्गावरून जाणाऱ्या एका कारला ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले.

yamuna expressway Accident:
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव गाडीनं आधी दोघींना उडवलं, नंतर कार 25 फूट खड्ड्यात उलटली

अपघाताची माहिती मिळताच जेवर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी चारही जखमींना मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

yamuna expressway Accident:
Accident News: भरधाव कारने मुलाला चिरडलं; 9 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू, मुंबईतील थरारक घटना

पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातात सामील असलेल्या ट्रकचा क्रमांक RJ05GB5526 आहे, तर कारचा नोंदणी क्रमांक DL9CBB0553 आहे. जेवर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या अपघातामुळे यमुना एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. सध्या घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.

दरम्यान यमुना एक्सप्रेसवेवर वारंवार अपघात होतात आणि अनेकदा त्यात दुर्दैवी जीवितहानी होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये अशीच एक घटना घडली होती. मथुरा येथील यमुना एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला होता. एक डबल-डेकर बस अनियंत्रित झाली होती. ही बस दुभाजकाला (डिव्हायडरला) जाऊन धडकली. त्यानंतर, मागून येणारी एक 'स्विफ्ट' कारही त्या बसवर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील पाच जण जळून मरण पावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com