West Bengal : भाजप कार्यकर्त्यांनी विवस्त्र करून मारहाण केली; महिलेचा आरोप, पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापलं

Woman Stripped Dragged on road beaten up badly bjp leader : पश्चिम बंगालमधील एका महिलेनं तिला भाजप नेत्याने मारहाण केल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी भाजप नेत्यावर कारवाई करण्यात आलीय.
 विवस्त्र करून मारहाण केली
Woman Stripped Dragged on roadSaam Tv
Published On

मुंबई : नंदीग्राममध्ये एका महिलेला घरात घुसून मारहाण करून बाहेर काढून रस्त्यावर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. भाजप नेते आणि त्यांच्या समर्थकांवर हा आरोप करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी या महिलेनं भाजपमधून टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. याप्रकरणी पश्चिम बंगालमधील नंदीग्राममध्ये भाजपच्या एका बूथ अध्यक्षाला अटक करण्यात आलीय.

भाजप नेत्याने मारहाण केल्याचा आरोप

भाजप नेता तापस दासच्या (bjp leader) साथीदारांनी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या महिलेनं नुकतंच भाजप सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. तापस दाससह इतर लोकांनी तिला नग्न अवस्थेत रस्त्यावर ओढले, असा आरोप पीडित महिलेनं केलाय. टीएमसीने पीडितेला भेटण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले होते. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलंय?

हा कौटुंबिक वाद असून त्याला राजकीय रंग दिला जात असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय. ही घटना गोकुळनगरच्या पंचानताळा येथे घडली. जखमी महिलेला नंदीग्राम सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात (Kolkata) आलंय. पीडितेने आरोप केलाय की, शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ती मुलगा आणि मुलीसोबत घरी होती. त्यानंतर काही लोकांनी जबरदस्तीने घरात घुसून तिला बाहेर काढलं. यानंतर लोकांनी तिला गावात ओढत नेलं, विवस्त्र करून मारहाण केली, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार (Woman Stripped Dragged on road beaten up) मिळतेय.

 विवस्त्र करून मारहाण केली
Thackeray Group Beat BMC Officer: शाखेवर हातोडा अधिकाऱ्याला चोप! बाळासाहेबांचा फोटो न काढू दिल्याने कार्यकर्त्ये संतापले

पोलिसांनी कारवाई केली

पीडित महिलेनं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, मी आधी भाजपमध्ये होते, पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत टीएमसीमध्ये सामील झाले. काही दिवसांपूर्वीही त्या (भाजप) लोकांनी मला मारहाण करून गावभर बदनामी केली (West Bengal) होती. त्यानंतरही पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली. शुक्रवारी हीच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात होता. परंतु नंदीग्राम फर्स्ट ब्लॉक भाजपचे संयोजक अभिजित मैती यांनी महिलेवरील हल्ल्याचा निषेध केलाय. याचा भाजपशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आमच्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय, असा आरोप त्यांनी केलाय.

 विवस्त्र करून मारहाण केली
Wife Beat Husband With Chappal: पत्नीकडून पतीची भररसत्यात धुलाई; गाल लाल होईपर्यंत चपलेने दिला चोप, VIDEO VIRAL

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com