नवरा जिवंत तरी सरकारला लावला चुना, ६० हजार महिला विधवा म्हणून घेताहेत पैसा : सर्व्हे

Delhi Widow Pension Scam: दिल्लीमध्ये महिलांच्या विधवा पेन्शन योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एका सरकारी सर्वेक्षणानुसार, तब्बल ६० हजार महिलांनी नवरा जिवंत असतानाही विधवा असल्याचा बनाव करत दरमहा पेन्शन घेतल्याचे समोर आले आहे.
Delhi Widow Pension Scam
Delhi Widow Pension ScamSaam Tv
Published On

DBT pension scheme fraud by fake beneficiaries : आर्थिक स्थिती खराब असणाऱ्यांना अथवा संकटात असणाऱ्यांसाठी सरकारकडून आर्थिक मदतीचा हात दिला जातो. गरजूंना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. पण त्यासाठी काही नियम आणि अटी, शर्थी ठेवल्या जातात. पण काहीजण नियम आणि अटी-शर्थी धाब्यावर ठेवत योजनांचा लाभ घेतात. त्याचा बोजा सरकारवर आणि सर्वसामान्यांवर येतो. राजधानी दिल्लीमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. दिल्ली सरकारकडून विधवा महिलांना प्रति महिना पेन्शनचा लाभ दिला जातो. पण तब्बल ६० हजार महिलांनी अटींमध्ये न बसता या योजनेचा लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. नवरा जिवंत असतानाही ६० हजार महिलांकडून विधवा पेन्शनचा लाभ घेतला जात आहे. सरकारकडून आता पुन्हा फेर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ६० हजारांपेक्षा जास्त महिलांनी चुकीच्या पद्धतीने सरकारी योजनाचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अधिाऱ्याने सांगितले की, काही महिलांनी नवरा जिवंत असतानाही विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेतला आहे. तर काही महिलांनी विधवा झाल्यानंतर पुन्हा लग्न केले आहे, पण तरीही त्यांनी या योजनेतून आपलं नाव कमी केले नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये सर्व्हे करण्यात आला होता, पण तरीही काही लाभार्थ्यांची नावे मिळालेली नाहीत.

Delhi Widow Pension Scam
Private Jet Crash : विमानतळाजवळ विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू, प्रसिद्ध बिझनेसमनचा मृत्यू

दिल्ली सरकारकडून डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला २५०० रूपयांची पेन्शन दिली जाते. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विधवा, घटस्फोटित, वेगळ्या राहत असलेल्या, निराधार महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडून ही योजना आणली होती. पण अनेक महिलांनी या योजनाचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

Delhi Widow Pension Scam
Amravati : हृदयद्रावक! निवृत्त पोलिसानं आयुष्य संपवलं, आजारपणाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय

घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार -

नोव्हेंबर २०२४ मध्ये सरकारने घरोघरी जाऊन व्हेरिफिकेशन करण्याची मोहीम सुरू केली होती. त्याअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी ११ जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली. महिला लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराला किमान पाच वर्षे दिल्लीचा रहिवासी असणे आवश्यक आहे. महिला विधवा असावी अथवा वेगळी राहात असावी, असे योजनेच्या पात्रता निकषांमध्ये स्पष्ट आहे.

Delhi Widow Pension Scam
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना जबरा धक्का; काँग्रेसनंतर ठाकरे गटाचे पदाधिकारीही शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com