Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना जबरा धक्का; काँग्रेसनंतर ठाकरे गटाचे पदाधिकारीही शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाणार

Big Setback to Uddhav Thackeray : धुळे शहरात काँग्रेसनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ललित माळी (शहर संघटक) आणि हरीश माळी (युवासेना जिल्हाध्यक्ष) यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला
Uddhav Thackeray's Shiv Sena faces mass exit in Dhule
ललित माळी, हरीश माळी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा भाजप प्रवेश, ठाकरे सेनेला मोठा धक्काSaam TV News Marathi
Published On

भूषण अहिरे, धुळे प्रतिनिधी

Uddhav Thackeray's Shiv Sena faces mass exit in Dhule : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेला हादऱ्यावर हादरे बसत आहेत. मुंबई, कोल्हापूर, नाशिक, मराठवाड्यासह आता धुळ्यातही ठाकरेंच्या शिवेसेनाला मोठा हादरा बसला आहे. धुळ्यामधील पदाधिकारी आणि शेकडो शिलेदारांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. धुळ्यातील शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले असून आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. धुळ्यामध्ये काँग्रेसलाही खिंडार पडले आहे.

Uddhav Thackeray's Shiv Sena faces mass exit in Dhule
Sharad Pawar Setback : भाजपचा शरद पवारांना जोरदार धक्का, आमदारकीचा उमेदवार साथ सोडणार

धुळ्यात काँग्रेस पाठोपाठ आता ठाकरेंच्या सेनेत देखील खिंडार

धुळ्यामध्ये काँग्रेस पाठोपाठ आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. धुळे शहर विधानसभा संघटक ललित माळी, आणि युवा सेना जिल्हाध्यक्ष हरीश माळी यांनी पक्षश्रेष्ठींकडे पक्षाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. काँग्रेस पाठोपाठ आता धुळ्यातील ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी देखील मुंबईत आज होणाऱ्या भाजप पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी धुळ्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकतो.

Uddhav Thackeray's Shiv Sena faces mass exit in Dhule
ठरलं! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण?

भाजपची ताकद वाढली -

धुळ्यातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकल्याने शिवसेनेत देखील धुळ्यात खिंडार पडले आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत शिवसेनेतून मुक्त होण्याचे पत्रक केले ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केले आहे. निवडणुकीच्या आधीच ठाकरेंची शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. ललित व हरीश माळी यांचं धुळे परिसरात मोठं राजकीय वजन असून, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. या प्रवेशाचा थेट फायदा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे. माळी यांच्यासोबत शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये आज सामील होणार आहेत.

Uddhav Thackeray's Shiv Sena faces mass exit in Dhule
Crime : एकतर्फी प्रेमातून भयंकर कृत्य, रूग्णालयात जाऊन नर्सचा गळा चिरला, लोकं बघत उभे राहिले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com