Crime : एकतर्फी प्रेमातून भयंकर कृत्य, रूग्णालयात जाऊन नर्सचा गळा चिरला, लोकं बघत उभे राहिले

nursing student : जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली. भरदिवसा नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या संध्या चौधरी हिची आरोपी अभिषेक कोष्ठी याने निर्घृण हत्या केली. एकतर्फी प्रेमातून अभिषेकने चाकूने तिच्या गळ्यावर सपासप वार करत तीचं प्राण घेण्याचा निर्णय घेतला.
Brutal murder of nursing student Sandhya Choudhary in MP hospital
Brutal murder of nursing student Sandhya Choudhary in MP hospital
Published On

Brutal murder of nursing student Sandhya Choudhary in MP hospital : मध्य प्रदेशमध्ये अतिशय धक्कादायक घटवा घडली आहे. नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. नर्सिंग रुग्णालयात घुसून आरोपीने मुलीचा गळा चिरला. ही थरारक घटना शुक्रवारी घडली आहे, त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या पायाखालची जमीन हादरली आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव संध्या चौधरी असं आहे. तर आरोपीचे नाव अभिषेक कोष्ठी असे आहे. अभिषेकने एकतर्फी प्रेमातून संध्याची हत्या केल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी अभिषेक याला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अभिषेकने नर्सिंग कॉलेजमध्ये जाऊन संध्याची चाकूने सपासप वार करत हत्या केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रूग्णालयात शेकडो लोक होते, त्यावेळी अभिषेकने सर्वांसमोर संध्याची गळा चिरून हत्या केली. एकही व्यक्ती संध्याला वाचवण्यासाठी पुढे आला नाही. अभिषेकने संध्याचा जीव गेतल्यानंतर गळ्यावरही चाकू मारण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओत संध्या तडफडत असताना आरोपीने पुन्हा तिच्यावर हल्ला केल्याचे दिसतेय. हे दृश्य इतके भयंकर आहे की पाहणाऱ्यांचे मन सुन्न झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणालाही संध्याला वाचवण्याचे धाडस झाले नाही.

Brutal murder of nursing student Sandhya Choudhary in MP hospital
Sharad Pawar Setback : भाजपचा शरद पवारांना जोरदार धक्का, आमदारकीचा उमेदवार साथ सोडणार

संध्या नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात ड्युटीवर होती. ती एका रूग्णाची काळजी घेत होती. त्यावेळी अभिषेकने अचानक तिच्यावर हल्ला केला. तिला काही समजण्याच्या आत अभिषेकने तिचा गळा चिरला. त्यानंतर खाली पडलेल्या संध्यावर चाकूने सपासप वार केले.काही क्षणांतच संध्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याने रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. आरोपी अभिषेक हा संध्यावर एकतर्फी प्रेम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Brutal murder of nursing student Sandhya Choudhary in MP hospital
Setback for Congress : उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, राहुल गांधींचा हुकमी एक्का भाजपात जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com