Private Jet Crash : विमानतळाजवळ विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू, प्रसिद्ध बिझनेसमनचा मृत्यू

James Weller family killed in Ohio plane crash :अमेरिकेतील ओहायो राज्यात रविवारी सकाळी झालेल्या खासगी विमान दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यंग्सटाउन-वॉरन विमानतळावरून टेकऑफ केल्यानंतर अवघ्या ७ मिनिटात विमान कोसळले.
private jet crash near Ohio airport
private jet crash near Ohio airportAI Photo
Published On

private jet crash near Ohio airport : अमेरिकेमध्ये विमान दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं अन् भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत पायलटसह ६ जणांचा जीव गेला आहे. रविवारी सकाळी यंग्सटाउन-वॉरन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच विमानाचा अपघात झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली. मृतांमध्ये प्रसिद्ध उद्योगपती जेम्स वेलर यांचा समावेश आहे. जेम्स वेलरची पत्नी व्हेरोनिका, मुलगा जॉन आणि सून मारिया यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

ईशान्य अमेरिकेतील ओहायो येथे रविवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. या भीषण विमान दुर्घटनेत जेम्स वेलर यांचं अख्ख कुटुंब संपलं. यंग्सटाउन-वॉरन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या ७ मिनिटांत खासगी विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानातील सर्व ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उद्योगपती जिम वेलर आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. हे कुटुंब मॉन्टाना येथील बोजमन येथे सुट्टीसाठी निघाले होते, पण त्याआधीच काळाने घाला घातला.

private jet crash near Ohio airport
Goods Transport Strike : स्कूल बसचा संप मागे; ट्रक, टेम्पो, टँकर संपावर ठाम, अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार

दुर्घटनेत कुणाचा मृत्यू झाला ?

पायलट जोसेफ मॅक्सिन (वय 63), को पायलट टिमोथी ब्लेक (वय 55), आणि प्रवासी व्हेरोनिका वेलर (वय 68), जेम्स वेलर (वय 67), जॉन वेलर (वय 36) आणि मारिया वेलर (वय 34) यांचा समावेश आहे. विमान वॉरन, ओहायो येथील मीनडर एअर एलएलसी यांच्या मालकीचे होते.

private jet crash near Ohio airport
Amravati : हृदयद्रावक! निवृत्त पोलिसानं आयुष्य संपवलं, आजारपणाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय

जेम्स वेलर कोण आहेत ?

जेम्स वेलर हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्याशिवाय ओहायोच्या रेसिंग विश्वातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. १९६५ मध्ये त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या लिबर्टी स्टील इंडस्ट्रीज या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनीने मोठी उलाढाल केली. जेम्स यांचा प्रभाव फक्त उद्योगविश्वातच नव्हता. बिग ब्लॉक मॉडिफाइड विभागात त्यांनी 36 रेस जिंकल्या आणि दोनदा ट्रॅक चॅम्पियनशिप पटकावली. त्यांचे वडील जेम्स वेलर सीनियर यांनी 2002 ते 2025 पर्यंत शॅरन स्पीडवेचे सह-मालकी हक्क सांभाळले होते.

private jet crash near Ohio airport
Buldhana : धक्कादायक! अभ्यास न केल्यानं शिक्षक रागावले, दहावीच्या मुलाने आयुष्य संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com