Dharmendra Pradhan: शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी पहिल्यांदाच मौन सोडलं

Ex Education Minister Dharmendra Pradhan: माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी झेन झीची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला.
Dharmendra Pradhan: शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी पहिल्यांदाच मौन सोडलं
Dharmendra PradhanSaam Tv
Published On
  • धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

  • राजीनामा का दिल्या मागचं कारण सांगत त्यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं

  • नीट पेपरफुटी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांनी दिला होता राजीनामा

  • जनरेशन झेडची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं. त्यांनी आपला मतदारसंघ संबलपूरमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना पहिल्यांदाच राजीनामा देण्यामागचं खरं कारण सांगितले. 'नीट पेपरफुटीच्या आंदोलनादरम्यान 'जनरेशन झेड'ची दिशाभूल झाली. त्यामुळे २५ जुलै रोजी राजीनामा द्यावा लागला, असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा जाहीर केल्यानंतर एक निवेदन जारी केले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी सर्वांसमोर जाहीर प्रतिक्रिया देत या राजीनाम्या मागचं मुख्य कारण सांगितले. संबलपूर येथे पद्म पुरस्कार विजेत्यांच्या सत्कार समारंभात बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल झाल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, जनरेशन झीची दिशाभूल करण्यात आली होती. २५ जुलैच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि मुलांची आणि देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन राजीनामा दिला.'

Dharmendra Pradhan: शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी पहिल्यांदाच मौन सोडलं
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा शिक्षणमंत्री कोण होणार? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

धर्मेंद्र प्रधान यांनी असेही सांगितले की, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि तरुण पिढीच्या तक्रारींचा राजकीय फायद्यासाठी वापर होऊ न देता त्यांच्या आकांक्षांना मान्यता देण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर पीएम मोदी सहमत झाले आणि नंतर त्यांनी स्वतः या विषयावर भाष्य केले. '

Dharmendra Pradhan: शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी पहिल्यांदाच मौन सोडलं
Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान आधी 'या' बड्या मंत्र्यालाही द्यावा लागला होता राजीनामा; त्यावेळी नक्की काय घडलं होतं?

तसंच, 'मी जनरेशन झेडचा बळी ठरलो आहे. काही काळापासून ज्याप्रकारे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले मला वाटत होते की काही लोक नव्या पिढीच्या मुलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पीएम मोदींना भेटलो आणि त्यांना जनरेशन झेडच्या इच्छेला मान्यता देण्याची विनंती केली. मी त्यांना सांगितले की, 'मला मुलांसमोर हे मान्य करण्याची परवानगी द्यावी. मी या प्रकरणात माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेला कधीही पणाला लावले नाही. पंतप्रधानांनी माझं म्हणणं मान्य केले आणि नंतर मी स्वतः मुलांसमोर याबद्दल बोलले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com