Election Survey: राजस्थानमध्ये कोणाची येणार सत्ता? भाजप की काँग्रेस, ताज्या सर्वेक्षणात कोण पुढे; जाणून घ्या

Rajasthan Election Survey: राजस्थानमध्ये कोणाची येणार सत्ता? भाजप की काँग्रेस, ताज्या सर्वेक्षणात कोण पुढे; जाणून घ्या
Rajasthan Election Survey
Rajasthan Election SurveySaam Tv
Published On

Rajasthan Election Survey:

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजकीय पक्ष प्रचाराच्या कमला लागले आहेत. यातच राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता राखते की भाजप सत्तेत येईल, यासाठी अनेक प्रकारचे सर्वेक्षण केले जात आहे. यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच इंडिया टीव्ही सीएनएक्सने राजस्थानमधील निवडणुकांबाबत सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाचे कल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस दोघांचीही झोप उडाली आहे. दोन्ही पक्षात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू आहे. त्याचबरोबर राजस्थान निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांचे हायकमांडही सक्रिय झाले आहे. राजस्थानमधील सर्व 200 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan Election Survey
MLA Disqualification Case: मोठी बातमी! 34 याचिकांची 6 याचिकेत विभागणी, आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं?

राजस्थानमध्ये झालेल्या या ओपिनियन पोलमध्ये मतदार काँग्रेसचे मतदान करणार की, भाजपला सत्तेत आणणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या ओपिनियन पोलमध्ये राजस्थानमध्ये यावेळी भाजप विजयी होताना दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, यावेळी राजस्थानमधील 200 जागांपैकी काँग्रेसला 72 जागा, भाजपला 125 तर इतरांना 3 जागा मिळू शकतात.

भाजपचा कोणत्या जगणावर होऊ शकतो विजय?

मेवाडमध्ये अटीतटीची लढत असून काँग्रेसला 15 तर भाजपला 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एक जागा अपक्ष उमेदरच्या वाट्याला जाताना दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, जयपूर आणि धौलपूर भागात विधानसभेच्या 48 जागा आहेत. यामध्ये लोकसभेच्या 6 जागांचा समावेश आहे.  (Latest Marathi News)

Rajasthan Election Survey
Garba Late Night Permission: आता मध्यरात्रीपर्यंत बिनधास्त खेळा गरबा! ३ दिवस रात्री १२ पर्यंत गरब्याला परवानगी

जयपूर आणि ढोलपूर ही या भागातील मोठी शहरे आहेत. राज्यवर्धन सिंह राठोड आणि भाजप खासदार बालकनाथ यांचा हा मतदारसंघ आहे. हा भाग महत्त्वाचा यासाठीही आहे कारण सचिन पायलट हे देखील दौसा येथून निवडणूक लढवतात. जर आपण जागांच्या बाबतीत बोललो तर भाजप 28, काँग्रेस 19 आणि इतर 1 जिंकू शकतो.

जर आपण टोंक आणि कोटा क्षेत्रांबद्दल बोललो तर येथे विधानसभेच्या 24 जागा आहेत. सचिन पायलट हे टोंकचे आमदार असून हे त्यांचे क्षेत्र आहे. तसेच वसुंधरा राजे झालावाडमधील झारलपाटणमधून निवडणूक लढवतात. ओम बिर्ला आणि शांती धारीवाल हेही याच भागातून येतात. टोंक, सवाई माधोपूर, कोटा, झालावाड-बारण या भागात येतात. जागांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, भाजप 13, काँग्रेस 11 आणि इतर 0 जिंकू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com