Ayodhya Ram Temple Trust New CEO: राम मंदिराचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा कोण आहेत?

Who is Jitendra Mishra: अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या सीईओपदी माजी भारतीय हवाई दल अधिकारी जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलीय. जवळपास 38 वर्षांच्या हवाई दलातील सेवेनंतर आता त्यांच्यावर राम मंदिर ट्रस्टची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Who is Jitendra Mishra:
Who is Jitendra Mishra new CEO of Ayodhya Ram Mandir Trustsaam tv
Published On
Summary
  • जितेंद्र मिश्रा यांची अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या सीईओपदी नियुक्ती

  • जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात जवळपास 38 वर्षे सेवा केली

  • निवृत्तीनंतर काही महिन्यांतच त्यांच्यावर राम मंदिर ट्रस्टची महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दान चोरी प्रकरण समोर आल्यानंतर मंदिराच्या ट्रस्टमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. आता अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या सीईओची नेमणूक करण्यात आलीय. भारतीय हवाई दलातील अनुभवी अधिकारी जितेंद्र मिश्रा यांच्या खांद्यावर सीईओची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Who is Jitendra Mishra:
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा आदेश; वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात SIT नेमा

कोण आहेत जितेंद्र मिश्रा?

जितेंद्र मिश्रा हे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भोपतपुरा गावचे रहिवासी आहेत. जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात जवळपास ३८ वर्षे सेवा दिलीय. त्यांच्याकडे लढाऊ विमाने उडवण्यापासून ते महत्त्वाच्या कमांड पदांवर काम करण्यापर्यंतच्या अनुभव आहे. जितेंद्र मिश्रा यांनी विविध जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. ते ३० एप्रिल २०२६ रोजी हवाई दलातून निवृत्त झालेत. आता निवृत्तीनंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्यावर 'राम मंदिर ट्रस्ट'मध्ये एका महत्त्वपूर्ण जबाबदारीची धुरा सोपवण्यात आलीय.

३,००० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव

जितेंद्र मिश्रा यांची ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलात फायटर पायलट (लढाऊ विमानचालक) म्हणून नियुक्ती झालीय. जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी फायटर पायलट म्हणून सेवा बजावलीय. मिश्रा यांनी विविध महत्त्वपूर्ण कमांड व स्टाफ पदे भूषवली. मिश्रा यांच्याकडे ३ हजार तासांहून अधिक विमान उड्डाण करण्याचा अनुभव आहे. यासह त्यांनी 'फायटर कॉम्बॅट लीडर' म्हणूनही काम केले आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी देशभरातील विविध महत्त्वाच्या लष्करी संस्थांमध्ये काम केले आहे. महत्त्वपूर्ण कार्यात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

Who is Jitendra Mishra:
संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी, संसद आवारात अवतरले मंदिरातले 'साधू', लोकसभा अध्यक्षांचा आंदोलनाला आक्षेप

भारत आणि परदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये घेतलंय शिक्षण

आपल्या लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान, जितेंद्र मिश्रा यांनी भारत आणि परदेशातील अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. ते पुण्यातील 'नॅशनल डिफेन्स अकादमी' (NDA) आणि बेंगळुरू येथील 'एअर फोर्स टेस्ट पायलट स्कूल'चे माजी विद्यार्थी आहेत. यासह त्यांनी अमेरिकेतील 'एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज' आणि युनायटेड किंगडममधील 'रॉयल ​​कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज' येथेही प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थांमध्ये मिळालेल्या अनुभवाने त्यांच्या लष्करी कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय.

फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर

आपल्या ३८ वर्षांच्या सेवाकाळात जितेंद्र मिश्रा यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले. यासह त्यांनी 'एअरक्राफ्ट अँड सिस्टम्स टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट' (ASTE) मध्ये 'चीफ टेस्ट पायलट' हे पदही भूषवले. त्यांनी दोन आघाडीच्या हवाई तळांचे 'एअर ऑफिसर कमांडिंग' म्हणूनही काम केलंय. याशिवाय हवाई मुख्यालयात त्यांनी संचालक (ऑपरेशनल प्लॅनिंग अँड असेसमेंट ग्रुप), प्रधान संचालक (ASR) आणि सहाय्यक हवाई दल प्रमुख (प्रकल्प) यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

ASTE ची कमांडंट जबाबदारी

जितेंद्र मिश्रा यांची 'एअरक्राफ्ट अँड सिस्टिम्स टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट' (ASTE) चे कमांडंट म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. ही हवाई दलासाठी विमाने आणि त्यांच्या प्रणालींच्या चाचणी घेण्यासाठी एक महत्त्वाची संस्था आहे. मिश्रा यांनी 'इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ' अंतर्गत सिद्धांत (doctrine), संघटना आणि प्रशिक्षण पाहणाऱ्या विभागात उपप्रमुख म्हणूनही काम केले. हवाई दलाच्या 'वेस्टर्न एअर कमांड'ची धुरा सांभाळण्यापूर्वी ते 'इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ' (ऑपरेशन्स) चे उपप्रमुख होते.जितेंद्र मिश्रा यांनी १ जानेवारी २०२५ मध्ये भारतीय हवाई दलाच्या पश्चिमी हवाई दलाचा कार्यभार देखील पाहिला होता. हे पद आधी एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांच्याकडे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com