राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा आदेश; वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात SIT नेमा

Ram Temple Donation Theft Probe: अयोध्या येथील श्री राम मंदिरातून दान चोरीला गेल्याच्या प्रकरणाबाबत सरन्यायाधीशांनी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) पुनर्रचना करण्याचे निर्देश दिलेत.
Ram Temple Donation Theft Probe
SUPREME COURT ORDERS NEW SIT LED BY SENIOR IPS OFFICER IN RAM TEMPLE DONATION THEFT CASEsaam tv
Published On
Summary
  • राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश.

  • SITची पुनर्रचना करून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे नेतृत्व सोपवण्याचे निर्देश.

  • न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

राम मंदिरातील देणगीतील वस्तूंच्या चोरी प्रकरणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी ही पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले. या पथकाचे नेतृत्व एका वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले.

Ram Temple Donation Theft Probe
NEET Protest : इंग्रज तरी ऐकायचे, हे सरकार तर...; माजी मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राम मंदिर चोरी प्रकरणी सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, यासंदर्भातील सद्यस्थितीचा अहवाल दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी न्यायालयाला हेही सांगितले की तपास सुरू आहे. आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आलीय.

मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने सुनावणी करताना सॉलिसिटर जनरल (SG) यांना विचारले की सध्या या प्रकरणाचा तपास कोण करत आहे. यावर सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले, "सत्य शोधण्यासाठी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. SIT च्या निदर्शनास आले आहे की, हा 'कॉग्निझेबल' गुन्हा (यात पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात) आहे.

यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, आम्ही ३ ते ४ दिवसानंतर याप्रकरणी पुन्हा सुनावणी करतील. त्यावेळी तपासाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. "एसआयटीत एक वरिष्ठ सदस्य होते का. तपासासाठी एसआयटीची स्थापना करता येईल का, ते पहावे." यावर सॉलिसिटर जनरल (SG) यांनी उत्तर दिले, "हो, आम्ही तिची स्थापना करू आणि ती अधिकृतपणे नोंदवू."

Ram Temple Donation Theft Probe
Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

त्यानंतर सरन्यायाधीशांनी (CJI) यासंदर्भात केवळ एक सल्ला दिला, या मुद्द्याचे राजकारण करू नका. "न्यायालये हे राजकारणाचे ठिकाण नाहीत. हे गुन्ह्याचे एक साधे प्रकरण आहे. तपास योग्य प्रकारे केला जाईल, का याची खात्री करणे एवढेच आपल्याला पाहायचं आहे." सरन्यायाधीशांनी पुढे नमूद केले, "हे गुन्हा घडल्याचे एक सरळ प्रकरण आहे. या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा, याची सुनिश्चिती करणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com