West Bengal election live results today : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल समोर आले असून ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का बसला आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा पार करत सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. पश्चिम बंगालमध्ये २ दशकानंतर सत्तांतर होत असल्याचे चित्र आहे. २९४ जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये तब्बल ९२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. ममता बॅनर्जींना सुरूवातीच्या कलांत हा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, हे फक्त सुरूवातीचे कल आहेत, अद्याप १५-२० फेऱ्या मतमोजणीच्या शिल्लक आहेत, त्यामुळे आकडे बदलू शकतात.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सुरूवातीच्या कलांमध्ये मोठा धक्का बसला आहे. २९४ जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये मतदान पार पडले होते. यामध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने १५५ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फक्त १०४ जागांवर आघाडीवर आहेत. हेच कल कायम राहिले तर पश्चिम बंगालमध्ये इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर असेल.
ममता बॅनर्जी यांना भवानीपूरमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याकडून जोरदार टक्कर मिळत आहे. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी या पिछाडीवर पडल्या होत्या. पण पुढील काही फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी यांनी कमबॅक करत आघाडी घेतली आहे. पण या जागेंवर आपण निवडून येऊ, असा विश्वास सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. सूवेंदू अधिकारी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन जागांवर निवडणूक लाढवली आहे. ममता बॅनर्जी सध्या ३००० मतांनी आघाडीवर आहेत.
सुवेंदू अधिकारी यांचा विजयाचा विश्वास
कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते आणि भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भवानीपूरमध्ये मतमोजणीच्या ६-७ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर माझी कामगिरी नक्कीच चांगली दिसेल. नंदीग्राममध्येही मला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. यावेळी हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाले आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत येईल आणि आमचेच सरकार स्थापन होईल.
यावेळी त्यांनी मुस्लीम मतदारांच्या भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, मुस्लीम मतदारांनी नेहमीप्रमाणे एकगठ्ठापणे तृणमूल काँग्रेसला (TMC) मतदान केलेले नाही; त्यातील काही मते इतर मुस्लीम समर्थक पक्षांकडे वळली आहेत. निकालाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून थोडा वेळ असून, घाई करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.