Election Result Live: ममता बॅनर्जी पिछाडीवर, भाजप उमेदवाराची मोठी आघाडी

Assembly Election Results Live Update : ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा आज फैसला होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता राखणार की भाजप मुसंडी मारणार, आणि तामिळनाडूमध्ये स्टालिन पुन्हा बाजी मारणार का, याचे चित्र आज स्पष्ट होईल. जाणून घ्या प्रत्येक मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
assembly election results 2026 west bengal assam kerala tamil nadu Puducherry
assembly election results 2026 west bengal assam kerala tamil nadu Puducherryसाम टीव्ही मराठी
Published On

हा विजय अद्भूत आणि अतुलनीय: पीएम मोदी 

डॉ. श्यामा प्रसाद यांच्या आत्म्यास शांती मिळाली आहे. त्यांनी आपल्या स्वप्नातील बंगालचे स्वप्न पाहिले होते. आज, ४ मे २०२६ रोजी, बंगालच्या जनतेने आम्हा भाजप कार्यकर्त्यांना ती संधी दिली आहे.

आसाम, तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळमध्ये जबरदस्त मतदान झालं.

पश्चिम बंगालमध्ये ९३ टक्के मतदान होणं हेच ऐतिहासिक: पीएम मोदी

आसामच्या जनतेन एनडीएवर विश्वास दाखवला. आसामची विकासाच्या दिशेने वाटचाल - मोदी

जय आणि पराजय हा लोकशाही आणि निवडणूक राजकारणाचा एक नैसर्गिक भाग आहे, परंतु या पाच राज्यांतील जनतेने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की आपला भारत लोकशाहीची जननी का आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे. गंगामातेच्या काठावरील राज्यांमध्ये आता भाजप-एनडीएची सरकार आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजचा विजय ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाल्यावर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो, तो मी पाहत आहे."

नंदीग्राम मतदारसंघातून सुवेदु अधिकारी यांची आघाडी

भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी हे नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मतमोजणीत त्यांनी आघाडी घेतली आहे. 18 ते 15 फेरी दरम्यान त्यांना 1538 ची आघाडी मिळाली आहे.

75 % भारतावर भाजपची सत्ता

आसाममध्ये भाजपचा ३० पैकी २३ जागांवर विजय, काँग्रेस अद्याप शून्यावर

आसाममधील ३० जागांचे निकाल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर निवडणूक आयोगाने आतापर्यंत आसाममधील ३० जागांचे निकाल जाहीर केले आहेत. भाजपने २३ जागा जिंकल्या असून, बीओपीएफ, एजीपी आणि एआययूडीएफने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. दरम्यान, काँग्रेसला अद्याप खाते उघडता आलेले नाही.

केरळमध्ये भाजपनं खातं उघडलं, एक उमेदवार विजयी 

ममता बॅनर्जी आता EVM वर निशाणा साधतील- देवेंद्र फडणवीस

पश्चिम बंगाल आणि आसामच्या निकालानंतर मुंबईमध्ये भाजपचा जल्लोष

आसाममध्ये भाजपची सत्तेची हॅटट्रिक

आसाममध्ये भाजप 98 जागांवर आघाडीवर

ममता बॅनर्जी भवानीपुर मतमोजणी केंद्रांवर दाखल

तामिळनाडूमध्ये थलपतीच्या ड्रायव्हरचा मुलगा आघाडीवर

आसाममध्ये भाजपचं शतक, 100 जागांवर आघाडी

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना 3 जागा

बहरामपूरमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर

भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बहारामपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी पिछाडीवर आहेत. मैत्रा यांना आतापर्यंत ३१,३६५ मते मिळाली आहेत, तर चौधरी यांना २६,०९९ मते मिळाली आहेत.

केरळमध्ये UDF बहुमत पार! शशी थरूर म्हणाले – बदलाची गरज

Assembly Election Results Live Update : मतमोजणीदरम्यान गैरप्रकाराचा आरोप ममता बॅनर्जी

राज्य निवडणुकांमधील एनडीएचा 'विजय' हा पंतप्रधान मोदींवरील लोकांचा सातत्यपूर्ण आणि वाढता विश्वास दर्शवतो.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

Assembly Election Results Live Update :  पश्चिम बंगालमध्ये भाजप १४८ जागांवर आघाडीवर

पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षानंतर सत्तांतर होत असल्याचे चिन्ह आहे. ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जातेय. ममता बॅनर्जींचा पक्ष फक्त ९९ जागांवर आघाडीवर आहे.

Assembly Election Results Live Update : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि TMC चे कार्यकर्ते आमनेसामने

मतमोजणी सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

Assembly Election Results Live Update :  विजय यांच्या टीव्हीकेने तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा केला पार

अभिनेते-राजकारणी विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेने तामिळनाडूत सत्तेच्या दिशेने पावले टाकली आहे. टीव्हीकेने बहुमताचा आकडा पार केला

Assembly Election Results Live Update :  तामिळनाडूमध्ये टीव्हीकेचे दमदार पदार्पण, बंगालमध्ये भाजपची उसळी

तामिळनाडूमध्ये तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) ने दमदार पदार्पण केले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने आघाडी घेतल्याने तृणमूल काँग्रेसवर दबाव वाढला आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतली आहे.

Assembly Election Results Live Update :  केरळमध्ये मुख्यमंत्री पिछाडीवर, काँग्रेस उमेदवार आघाडीवर

केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन धर्माडोम मतदारसंघात पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार व्ही. पी. अब्दुल रशीद यांनी सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. एलडीएफचा चेहरा असलेले आणि या जागेवरून तीन वेळा निवडणूक लढवलेले विजयन, ईव्हीएम मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये ७०० हून अधिक मतांनी मागे असल्याचे वृत्त आहे.

Election Result Live : पश्चिम बंगालमध्ये ममतांना जोरदार धक्का, भाजपने बहुमताचा आकडा गाठला

पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होत असल्याचे चित्र आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपने तब्बल १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतले आहे. दुसरीकडे टीएमसी फक्त १०० जागांवर आघाडीवर आहे.

Election Result Live : तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन पिछाडीवर

ही तर फक्त सुरुवात आहे, संपूर्ण राज्यात मतमोजणी कशी सुरू आहे ते आम्ही पाहू. प्रत्येक फेरीत प्रत्येक मताची योग्य रित्या मोजणी होत आहे, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
आसाम काँग्रेसचे प्रमुख गौरव गोगोई

अभिनेता विजयला मोठं यश, अनेक जगांवर आघाडीवर

सुरुवातीच्या कलानुसार अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष तमिळनाडूमध्ये एक पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनण्याची शक्यता आहे. अनेक जागांवर टीव्हीकेने एआयएडीएमकेला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे, तर द्रविड मुन्नेत्र कळघम शर्यतीत आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलानुसार तिरुचिरापल्ली पूर्व आणि पेरांबूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये विजय यांना आघाडी मिळाली.

पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार? 

भाजप १२९ जागांवर आघाडीवर आहे, तर ममता बॅनर्जी यांचा टीएमसी ११२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे

Election Result Live : भवानीपूरमध्ये ममता पिछाडीवर, पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होणार?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्ये पिछाडीवर आहेत.

Election Result Live : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने जोरदार टक्कर देत आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष ९६ जागांवर आघाडीवर आहेत.

Assembly Election Results Live Update : मतमोजणीच्या आधीच पश्चिम बंगालमध्ये झाला राडा!

पश्चिम बंगालमधील बिधाननगर मतमोजणी केंद्राबाहेर मतमोजणीच्या आदल्या रात्री मोठा तणाव निर्माण झाला. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि राडा झाल्याने परिस्थिती चिघळली.

दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने स्ट्रॉंग रूम परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप करत प्रतिक्रिया दिली आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बंगालमध्ये पोस्टल मतमोजणी शेवटी होणार  

Assembly Election Results Live Update : मतमोजणी पूर्ण होण्याआधीच भाजपचा जल्लोष

दिल्लीतील भाजप मुख्यालयात मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच जल्लोषाची तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वीच भाजप कार्यालयात मिठाई आणि खाद्यपदार्थांची तयारी करण्यात आली आहे.

Election Result Live :सुरुवातीच्या कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर

पश्चिम बंगालमधील अत्यंत महत्त्वाच्या लढतीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या विधानसभेत भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे. मथाभंगा मतदारसंघातून भाजपचे निशिथ प्रमाणिक आघाडीवर आहेत. राज्यात भाजप २७ तर टीएमसी २६ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे.

Assembly Election Results : पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर

पश्चिम बंगालमध्ये भाजप २७ जागांवर आघाडीवर आहे. टीएमसीकडूनही कडवी टक्कर मिळत आहे. ममतांच्या टीएमसीचे १८ उमेदवार आघाडीवर आहेत.

Assembly Election Results Live Update : आसाममध्ये भाजप १७ जागांवर आघाडीवर

Election Result Live : पश्चिम बंगालमध्ये उलटफेर, भाजपने घेतली आघाडी; केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर

पाच राज्यांमधील ८२३ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरूवातीचे कल समोर येऊ लागले असून पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर झाल्याचे दिसतेय. बंगालमधील सुरूवातीच्या कलानुसार टीएमसी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत दिसत आहे. भाजपने आघाडी घेतली असून टीएमसीकडूनही टक्कर पाहायला मिळत आहे. तर तिकडे केरळमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.

Election Result Live : तामिळनाडूत पहिला कल TVK च्या बाजूना लागलाय.

Election Result Live : ५ राज्यात मतमोजणीला सुरूवात

आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यासोबतच पाच राज्यांतील विधानसभेच्या ७ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही आजच स्पष्ट होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ जागांपैकी २९३ जागांवर आज मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. तर फाल्टा विधानसभा मतदारसंघात २१ मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे.

West Bengal Election Results : शेवटच्या क्षणी Mamata Banerjee यांचा महत्त्वाचा संदेश 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केलाय. राज्यभरातील मतमोजणी पर्यवेक्षक आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक 'व्हर्च्युअल मीटिंग' घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावलंय. "आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येतोय. आश्वस्त रहा, सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडा.. अखेरचं मत मोजेपर्यंत मतदान केंद्र सोडू नका, असे आदेश ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना दिलेत.

Assembly Election Results : भवानीपूरमध्ये कडक बंदोबस्त आणि चुरशीची लढत

पश्चिम बंगालमधील २९३ विधानसभा जागांसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील सखावत मेमोरियल गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल येथील मतमोजणी केंद्राबाहेर प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भवानीपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या (TMC) उमेदवार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार सुवेंदु अधिकारी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. या दोन दिग्गज नेत्यांमधील थेट लढतीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

बंगालमध्ये दीदीला धक्का, भाजपची सत्ता येणार? | West Bengal Election Result

Election Result Live : ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा आज फैसला

Election Result Live : ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा आज फैसला होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता राखणार की भाजप मुसंडी मारणार, आणि तामिळनाडूमध्ये स्टालिन पुन्हा बाजी मारणार का, याचे चित्र आज स्पष्ट होईल. जाणून घ्या प्रत्येक मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Assembly Election Results Live Update : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (२०२६) निकाल आज, ४ मे २०२६ रोजी जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com