Political News: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

TMC Ex MLA Death: पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या बड्या नेत्याचं निधन झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान उज्ज्वल बिस्वास यांनी अखेरचा श्वास घेतला.
Political News: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
TMC Ex MLA DeathSaam Tv
Published On: 

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या दिग्गज नेत्याचं निधन झाले. नादिया जिल्ह्यातील टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळाचे माजी सदस्य उज्ज्वल बिस्वास यांचे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. बिस्वास हे नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले होते. २०२६ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार साधन घोष यांनी त्यांचा पराभव केला होता. बिस्वास यांच्या निधनामुळे पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला.

काही दिवसांपूर्वी उज्ज्वल बिस्वास यांची प्रकृती बिघडली होती. गेल्या १० दिवसांहून त्यांच्यावर कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर टीएमसीच्या नेत्यांनी गर्दी केली आहे. उज्ज्वल बिस्वास यांच्या निधनानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उज्ज्वल विश्वास भ्रष्टाचाराच्या वादात अडकले. त्यांच्या कृष्णनगर येथील घरातून मोठ्या प्रमाणात मदत साहित्य जप्त करण्यात आले. जनतेसाठी असलेले मदत साहित्य त्यांनी वाटप न करता साठवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी त्यांच्यावर अंडीही फेकली. त्यांना विविध प्रकारे त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Political News: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
Political News: मोठी बातमी! TMC, शिवसेनेनंतर देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटणार, कॅबिनेट मंत्र्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

या भ्रष्टाचार प्रकरणात ते ३० दिवस तुरुंगात होते. नंतर, जामीन मिळाल्यानंतरही त्यांना दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यात आली. ४९ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर उज्ज्वल यांची पॅरोलवर सुटका झाली. तृणमूलच्या सूत्रांचा दावा आहे की, या घटनेचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला. त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.

Political News: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
ममता बॅनर्जी पुन्हा संतापल्या! थेट TMC कार्यकर्त्याला कानशिलात लगावली; व्हिडिओ व्हायरल होताच राजकारण तापलं

पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक टीएमसी नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच, टीएमसी आमदार परेशराम दास यांना पोलिसांनी विमानतळावरून अटक केली. ते बलात्कार आणि खंडणीच्या अनेक प्रकरणांमध्ये फरार होते. उज्ज्वल बिस्वास यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले. उज्ज्वल बिस्वास यांना ४९ दिवस तुरुंगात डांबण्यात आले, खोट्या प्रकरणांमध्ये गोवण्यात आले आणि प्रचंड शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागले, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केला.

Political News: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'उज्ज्वल बिस्वास यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. सार्वजनिक जीवनात ते माझ्यासाठी एका सहकाऱ्यापेक्षाही अधिक होते. आमचे खूप काळापासून एक घट्ट आणि अतूट नाते होते. माजी मंत्री, आमदार आणि तृणमूल काँग्रेस परिवाराचे एक समर्पित सदस्य म्हणून उज्ज्वल बिस्वास यांनी आपले जीवन पक्षाच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. त्यांचे निधन ही माझ्यासाठी एक मोठी वैयक्तिक हानी आहे आणि त्यामुळे एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून येणार नाही.'

Political News: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
TMC नाव आणि चिन्हाच्या वादावर मोठी अपडेट; शिवसेना पक्ष-चिन्ह वादाचाही सुप्रीम कोर्टाकडून उल्लेख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.