निवडणूक प्रचाराच्या नियमांत मोठा बदल; आगामी विधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

Election Commission Issues New Guidelines : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचाराच्या नियमांत महत्त्वाचा बदल केलाय. निवृत्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही नव्या नियमांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Election Commission New Rules: Retired Government Officials Under Campaign Restrictions
Election Commission New Rules: Retired Government Officials Under Campaign Restrictionssaam tv
Published On: 
Summary
  • केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचाराच्या नियमांत बदल केलाय.

  • निवृत्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही नव्या नियमांच्या कक्षेत समावेश

  • सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर यापूर्वीपासूनच राजकीय प्रचारासंदर्भात निर्बंध

कोणतीही निवडणूक म्हटलं की प्रचार आलाच. या प्रचारात कार्यकर्ते असतातच शिवाय त्या-त्या पक्षाच्या विचारधारेला मानणारे इतर सामान्य नागरिकही प्रचारात सामील होत असतात. मग ती व्यक्ती कोणी असो, ते प्रचारात सामील होत असता. मात्र आता निवडणुकीच्या प्रचाराला कोणालाही सहभागी होता येणार नाही. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारासाठी नवीन नियम लागू केले आहेत.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणताही राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी होता येत नाही. आचारसंहितेची अनेक बंधने त्यांच्यावर असतात. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या नियमांमध्ये निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश केलाय. देशातील उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपासून आयोगाने हे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार संबंधित राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेत.

Election Commission New Rules: Retired Government Officials Under Campaign Restrictions
सरकारी बाबूंसाठी महत्त्वाची बातमी; ४८ तासांपेक्षा जास्त वेळ तुरुंगात राहिलात तर ऑटोमॅटिक व्हाल सस्पेंड!

निवडणूक आयोगाने म्हटलं की, शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही निवडणूक प्रचारात किंवा प्रचारमोहिमेत भाग घेऊ नये. एखाद्या व्यक्तीला, राजकीय पक्षाला दुसऱ्याच्या विरोधात मदत करण्यासाठी आपले नाव, अधिकृत पद किंवा अधिकार वापरणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश आयोगाने यापूर्वीच दिलेत. आदर्श आचारसंहितेतील हे नियम शासनाच्या सर्वप्रकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होत असतात.

Election Commission New Rules: Retired Government Officials Under Campaign Restrictions
CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

राज्यांमधील संबंधित आचारसंहितेच्या नियमांनुसार, शासकीय कर्मचाऱ्यांना राजकीय कार्यात आणि निवडणुकांमध्ये भाग घेण्यास मनाई आहे. यापुढे राज्य सरकारांकडून नियुक्त करण्यात आलेल्या निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनाही हे नियम लागू असतील. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडून विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या इतर व्यक्तींनाही हे निर्बंध लागू होतील, असे आयोगाने स्पष्ट केलंय.

काय आहेत नियम

शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेले निर्बंध आणि मनाई, आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही लागू होतील. यासह ज्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

तेथील कोणत्याही निवडणूक संबंधित अधिकाऱ्याला कोणत्याही अधिकृत चर्चेसाठी/बैठकांसाठी बोलावू नये किंवा अशा कोणत्याही अधिकाऱ्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स/बैठका घेऊ नयेत.

आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन करणारी कोणतीही कृती करणे किंवा न करणे हे गंभीर मानले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.