

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी १५ सरकारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये CO आणि BDO यांचाही समावेश
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या ऐकून घेतल्या.
कर्मचाऱ्यांनो, कामाची शिस्त, कामातील प्रमाणिक ठेवा. जर कामात दिरंगाई केली तर तुमची नोकरी गेली समजा. त्याच कारण असं प्रशासनात सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना चाप बसवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धडाडीचा निर्णय घेत थेट १५ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरींनी १५ निष्काळजी अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. पाटण्यात आयोजित 'सहयोग शिबिरा'त (जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयोजित शिबिर) प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केलीय. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विविध जिल्ह्यांत कार्यरत असलेले सर्कल ऑफिसर, गट विकास अधिकारी (BDO), अभियंता, कार्यकारी अधिकारी आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
पाटणा येथील मुख्यमंत्री सचिवालयात मंगळवारी राज्यस्तरीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री सम्राट चौधरींनी सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्या त्वरित निकाली काढण्यासाठी संबंधित विभाग व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निर्देश दिले. दरम्यान, 'सहयोग' (Sahyog) कार्यक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही न केल्याबद्दल, निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी १५ अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित केले. तसेच, या निलंबित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
जय प्रकाश, मंडळ अधिकारी, हवेली खरगपूर, जिल्हा - मुंगेर
अर्चना कुमारी, मंडळ अधिकारी तेतिया बंबर, जिल्हा- मुंगेर
रवी रंजन, गट विकास अधिकारी, आरा सदर, जिल्हा - भोजपूर
संजीव कुमार, मंडळ अधिकारी, कोरहा, जिल्हा - कटिहार
संतोषकुमार सुमन, मंडळ अधिकारी, नौगाचिया, जिल्हा - भागलपूर
पंकज कुमार, मंडळ अधिकारी, फोर्ब्सगंज, जिल्हा - अररिया
रमेश कुमार, मंडळ अधिकारी, बोधगया, जिल्हा - गया
रंजीत कुमार उपाध्यय, मंडळ अधिकारी, मखदुमपुर, जिल्हा- जहानाबाद
प्रियंका सिंह, मंडळ अधिकारी, त्रिवेणीगंज, जिल्हा- सुपौल
वीणा वैशाली, कार्यकारी अधिकारी, निर्मली आणि सिमराही, जिल्हा- सुपौल
रोहित कुमार दुबे, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा- शेखपुरा
भोला नाथ, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा मुझफ्फरनगर
श्याम बाबू राय, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक आरोग्य विभाग (मजौलिया), जिल्हा: पश्चिम चंपारण
पवन कुमार, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक आरोग्य विभाग (सुरसंद), जिल्हा: सीतामढी
शुभम कुमार, महसूल कर्मचारी, माजी पोस्टिंग,उचकागाव (वर्तमान पोस्टिंग: बाजपट्टी, सीतामढी), जिल्हा-गोपालगंज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.