Pani Puri Food Poisoning: ऐन दिवाळीत पाणीपुरी खाल्ल्याने १५० हून अधिक जणांना विषबाधा; २५ जण रुग्णालयात दाखल

Food Poisoning Case: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्यानंतर १५० हून अधिक जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. यातील २५ जणांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून, लहान मुलांचाही समावेश आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
Pani Puri Food Poisoning
Pani Puri Food Poisoningsaam tv
Published On: 

पाणीपुरी म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. रस्त्यावर पाणीपुरीचा ठेला दिसला की ती खाण्यासाठी अनेकांची गर्दी होते. पण उघड्यावर मिळणारे पदार्थ खाल्ल्याने कधी कधी आरोग्याला त्रास होऊ शकतो. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात अशीच एक घटना घडलीये. खेसरहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्लाखोर आणि पेडारी या दोन गावांमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने १५० हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकारानंतर उलट्या आणि जुलाबाचा त्रास झालेल्या २५ जणांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलंय. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

पाणीपुरी खाल्ल्यानंतर लगेच कोणालाही त्रास झाला नाही. परंतु रात्री अचानक पाणीपुरी खाल्लेल्या लोकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. काही वेळातच दोन्ही गावांतील अनेकांची तब्येत बिघडली.

Pani Puri Food Poisoning
Former BJP MP: 2 वेळा खासदार राहिलेल्या भाजपच्या नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

मध्यरात्री गावात गोंधळ, सकाळपर्यंत १५० जण आजारी

मध्यरात्रीपर्यंत दोन्ही गावांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. उलट्या आणि जुलाबाचा त्रास होणाऱ्या लोकांची संख्या वाढतच होती. शनिवार सकाळपर्यंत १५० हून अधिक जण आजारी पडले.

Pani Puri Food Poisoning
Shiv Sena: मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? शिंदेसेनेच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

यातील काही जणांनी गावातील खासगी डॉक्टरांकडून औषधं घेतली तर काहींनी मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करून खाल्ली. काही जणांनी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. औषधं घेतल्यानंतर अनेकांना आराम मिळाला. मात्र २५ हून अधिक जणांची प्रकृती सुधारत नव्हती.

सीएमओंकडून दोन्ही गावांची पाहणी

या घटनेची माहिती ग्रामप्रधान आदित्य प्रताप सिंह यांना मिळाली. त्यांनी तातडीने बसची व्यवस्था केली आणि आजारी लोकांना मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं. त्याठिकाणी २५ रुग्णांना दाखल करण्यात आलंय. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. सीएमएस यांच्या देखरेखीखाली आरोग्य कर्मचारी रुग्णांवर उपचार करत आहेत.

Pani Puri Food Poisoning
Washing Machine Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतरही घाणेरडा वास येतोय? 'या' चुका आजच टाळा

मेडिकल कॉलेजचे सीएमएस डॉ. एस.एन. उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती मिळताच सीएमओ डॉ. संजय दोहरे यांनी कल्लाखोर आणि पेडारी या दोन्ही गावांना भेट दिली. त्यांनी आजारी लोकांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच त्यांना नेमका कोणता त्रास होतोय याची माहिती घेतली. गावातील पाहणीदरम्यान रुग्णांची प्रकृती ठीक असल्याचं सीएमओंनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.