Washing Machine Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतरही घाणेरडा वास येतोय? 'या' चुका आजच टाळा

Laundry Tips: वॉशिंग मशीनमध्य कपडे धुतल्यानंतरही दुर्गंधी येते का? जास्त डिटर्जंट वापरणे, मशीनमध्ये अधिक कपडे भरणे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अशा चुका टाळा. कपड्यांचा रंग आणि ताजेपणा टिकवण्यासाठी वॉशिंग मशीन वापरताना कोणती काळजी घ्यावी ते पाहा.
Washing Machine Tips
Washing Machine Tipssaam tv
Published On: 

आजकाल जवळपास प्रत्येक घरात वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. वॉशिंग मशीनमुळे कपडे धुण्याचं काम खूप सोपं झालं आहे. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. पण अनेकदा मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतरही त्यांना दुर्गंधी येते. काही कपड्यांवरील डाग तसेच राहतात तर काही कपडे धुतल्यानंतर फिके दिसू लागतात. अशा वेळी अनेक जण वॉशिंग मशीनमध्येच काहीतरी बिघाड असल्याचा विचार करतात. पण प्रत्येक वेळी मशीनमध्ये बिघाड असतोच असं नाही. अनेकदा मशीन वापरताना आपण केलेल्या छोट्या चुका याला कारणीभूत असतात.

डिटर्जंटचा योग्य वापर न करणं, मशीनमध्ये एकाच वेळी जास्त कपडे भरणं किंवा मशीनची वेळेवर स्वच्छता न करणं यामुळे कपड्यांचा रंग आणि ताजेपणा कमी होऊ शकतो. पण काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कपडे चांगले स्वच्छ होऊ शकतात. त्यासाठी वॉशिंग मशीन वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.

वॉशिंग मशीन वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

मशीनमध्ये जास्त कपडे भरू नका

अनेक जण वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळी मशीनमध्ये जास्त कपडे टाकतात. पण असं करणं टाळा. मशीनमध्ये खूप कपडे भरल्यामुळे पाणी आणि डिटर्जंट प्रत्येक कपड्यापर्यंत नीट पोहोचत नाही. त्यामुळे कपड्यांवरील मळ आणि डाग पूर्णपणे निघत नाहीत. याशिवाय मशीनच्या मोटरवरही जास्त ताण येतो. त्यामुळे मशीनच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

Washing Machine Tips
Kitchen knife direction: स्वयंपाकघरात चाकू कोणत्या दिशेला ठेवावा? चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास येईल आर्थिक तंगी, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

डिटर्जंटचा वापर योग्य प्रमाणात करा

कपडे जास्त स्वच्छ व्हावेत म्हणून अनेक जण जास्त डिटर्जंट टाकतात. पण ही सवय चुकीची आहे. गरजेपेक्षा जास्त डिटर्जंट वापरल्यास त्याचे डाग कपड्यांमध्ये राहू शकतात. त्यामुळे कपडे कडक होतात. काही लोकांच्या त्वचेला यामुळे खाज किंवा जळजळही होऊ शकते. त्यामुळे किती कपडे आहेत आणि ते किती मळलेले आहेत यानुसार डिटर्जंट वापरावं.

वॉशिंग मशीनची नियमित स्वच्छता करा

कपडे स्वच्छ ठेवण्यासाठी वॉशिंग मशीन स्वच्छ ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मशीनचा ड्रम, डिटर्जंट ठेवण्याची ट्रे, रबरची पट्टी आणि फिल्टरमध्ये हळूहळू मळ, बुरशी, कपड्यांचे छोटे धागे आणि डिटर्जंटचे अंश जमा होतात. त्यामुळे मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतरही त्यांना वास येऊ शकतो.

Washing Machine Tips
Kitchen Vastu Tips: गॅस आणि सिंक एकाच ओट्यावर असणं अशुभ? वाचा वास्तुशास्त्राचा नियम काय सांगतो, उपायही जाणून घ्या

कपड्यांनुसार वॉश मोड निवडा

प्रत्येक प्रकारचे कपडे एकाच पद्धतीने धुता येत नाहीत. सुती, जीन्स, सिंथेटिक, रेशमी आणि लोकरीचे कपडे यांच्यासाठी वेगवेगळे वॉश मोड असतात. नाजूक कपड्यांसाठी जेंटल सायकल निवडावी. तर जास्त मळलेल्या कपड्यांसाठी योग्य वॉश मोड वापरावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.