Kitchen Vastu Tips: गॅस आणि सिंक एकाच ओट्यावर असणं अशुभ? वाचा वास्तुशास्त्राचा नियम काय सांगतो, उपायही जाणून घ्या

Modular Kitchen Vastu: स्वयंपाकघरात गॅस शेगडी आणि सिंक शेजारी असल्यास वास्तुशास्त्रानुसार काय परिणाम होतात? अग्नी आणि जल तत्वांचे महत्त्व, गॅसची योग्य दिशा, सिंकची जागा आणि वास्तुदोष कमी करण्यासाठी सांगितलेले तीन सोपे उपाय जाणून घ्या.
Kitchen Vastu Tips
Kitchen Vastu Tipssaam tv
Published On: 

घरातील स्वयंपाकघर म्हणजे केवळ जेवण बनवण्याची जागा नाही तर घरातील महत्त्वाचा भाग आहे. वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला एक ठराविक जागा आणि दिशा असते. पण आजकाल जागेची कमतरता किंवा वास्तुशास्त्राची माहिती नसल्यामुळे अनेक जण मॉड्युलर किचन बनवताना एकाच ओट्यावर गॅस आणि भांडी धुण्याचा सिंक अगदी शेजारी बसवतात.

वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट योग्य मानली जात नाही. गॅस आणि सिंक जवळ असल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. हा दोष कशामुळे निर्माण होतो आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात, जाणून घेऊया.

अग्नी आणि जल या दोन विरुद्ध तत्वांचा परिणाम

वास्तुशास्त्र हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्वांवर आधारित आहे. या पाचही तत्वांमध्ये योग्य संतुलन असणं महत्त्वाचं मानलं जातं. स्वयंपाकघरात प्रामुख्याने अग्नी आणि जल या दोन तत्वांना विशेष महत्त्व आहे.

Kitchen Vastu Tips
Vastu Tips: घरातील जुने कपडे आणि अंतर्वस्त्र लादी पुसण्यासाठी वापरताय? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

अग्नी तत्व (गॅस शेगडी)

किचनमधील गॅस शेगडी ही अग्नी तत्वाचं प्रतीक मानली जाते. अग्नीमुळे घरात ऊर्जा, उत्साह आणि जीवनशक्ती टिकून राहते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. गॅस शेगडी ठेवण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय कोपरा शुभ मानला जातो.

जल तत्व (सिंक आणि नळ)

किचनमधील सिंक आणि पाण्याचा नळ हे जल तत्वाशी संबंधित आहेत. जल तत्व हे स्वच्छता, शुद्धता आणि विचारांचा प्रवाह यांचं प्रतीक मानलं जातं. सिंकसाठी उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशा योग्य असल्याचं वास्तुशास्त्र सांगतं.

गॅस आणि सिंक जवळ असल्याने काय होतं?

अग्नी आणि जल ही दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाची तत्वं आहेत. त्यामुळे ती एकमेकांच्या अगदी जवळ असणं योग्य मानलं जात नाही. वास्तुशास्त्रानुसार, एकाच ओट्यावर गॅस शेगडी आणि सिंक शेजारी असल्यास या दोन्ही तत्वांमध्ये संघर्ष निर्माण होतो. असं मानलं जातं की, पाण्यामुळे अग्नी तत्वाची शक्ती कमी होते. त्यामुळे आग्नेय दिशेतील अग्नीची सकारात्मकता कमी होऊन संपूर्ण स्वयंपाकघरातील वास्तूचं संतुलन बिघडू शकतं.

गॅस आणि सिंक जवळ असल्यास होऊ शकतात हे ३ परिणाम

वास्तुशास्त्रानुसार, घरातील अग्नी आणि जल तत्वांमध्ये सतत संघर्ष होत असेल, तर त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर होऊ शकतो. यामुळे पुढील तीन समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मानलं जातं.

आर्थिक अडचणी वाढू शकतात

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील अग्नीचा संबंध घरातील सुख-समृद्धी आणि आर्थिक अडचणीशी जोडला जातो. अशा वेळी गॅस शेगडीच्या अगदी शेजारी सिंक असल्यास घरातील आर्थिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो, अशी मान्यता आहे.

Kitchen Vastu Tips
Vastu Tips: फ्रिजच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; घरात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी वास्तूचे हे नियम नक्की पाळा

घरात भांडणं आणि वाद वाढू शकतात

अग्नी आणि जल ही विरुद्ध तत्वं एकाच ठिकाणी असल्यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होतं, असं मानलं जातं. या वास्तुदोषामुळे स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नावरही त्याचा परिणाम होतो, अशी वास्तुशास्त्रात धारणा आहे.

पचन आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात

वास्तुशास्त्रानुसार, नकारात्मक वातावरणात तयार झालेलं अन्न खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. याचा परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो, असं मानलं जातं. घरातील प्रमुख व्यक्ती किंवा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला पोटाच्या समस्या, रक्तदाब आणि मानसिक तणावाचा त्रास जाणवू शकतो.

गॅस आणि सिंक जवळ असतील तर करा हे ३ सोपे उपाय

तुमच्या घरात आधीच मॉड्युलर किचन तयार असेल आणि गॅस व सिंकची जागा बदलणं शक्य नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. वास्तुशास्त्रानुसार, कोणतीही तोडफोड न करता या वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

  • गॅस आणि सिंकमध्ये लाकडी पार्टिशन ठेवा

  • मध्ये छोटी हिरवी रोपं ठेवा

  • तांब्याची वस्तू किंवा क्रिस्टल ठेवा

  • गॅस आणि सिंक यांच्या मधल्या मोकळ्या जागेत छोटं क्लिअर क्वार्ट्ज क्रिस्टल किंवा तांब्याची वस्तू ठेवू शकता.

Kitchen Vastu Tips
Evening Diya Rules: दररोज संध्याकाळी घरी दिवा लावताय ना? नकळत होणाऱ्या या चुका टाळा

अशा प्रकारे, किचनमध्ये गॅस शेगडी आणि सिंक ठेवताना त्यांच्या जागेकडे लक्ष देणं वास्तुशास्त्रानुसार महत्त्वाचं मानलं जातं. मात्र, जागेची अडचण असल्यास वरील उपाय करून हा वास्तुदोष कमी करण्याचा प्रयत्न करू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)