राजकारणात मोठा उलटफेर; ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, पक्षातील ५८ आमदार फुटले

TMC rift : पश्चिम बंगालमधील राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे.
Mamata Banerjee news
Mamata Banerjee saam tv
Published On
Summary

राजकारणात मोठा उलटफेर

ममता बॅनर्जी यांना बसला मोठा धक्का

तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरांच्या गटाला विधानसभेत मंजुरी

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी ५८ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे.

तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे. त्यानंतर ऋतब्रत यांनी ५८ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे विधानसभा अध्यक्षांना दिलं. पक्षांतर बंदी कायद्याच्या माध्यमातून कारवाई होऊ नये, यासाठी ५४ आमदारांची गरज होती. आता बंडखोरी करणाऱ्या ५८ आमदारांचा वेगळा गट स्थापन झाला आहे.

Mamata Banerjee news
निवडणुकीत पराभव होताच TMC पक्षात फूट? आमदारांमध्ये पडले दोन गट, राजकीय वर्तुळात खळबळ

ऋतब्रत बॅनर्जी यांची पश्चिम बंगालच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळाली आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, 'विधानसभा अध्यक्षांनी माझी विरोधी पक्षनेते म्हणून निवडीला मंजुरी दिली आहे. मी आता विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका निभावेल'.

नव्या विरोधी गटाने चार उपनेत्यांची निवड केली आहे. यात जावेद अहमद खान, सबीना यास्मीन, संदीपन साहा आणि सिउली साहा यांच्या नावाचा समावेश आहे. ऋतब्रत बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जी आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या सल्लागार राहतील. त्या आमच्या भविष्यातील मार्गदर्शक राहतील. बंडखोर गटात आणखी आमदार सहभागी होतील'.

तृणमूल काँग्रेस कशी फुटली?

तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. तृणमूल काँग्रेसने ६ मे २०२६ रोजी शोवनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून शिफारस केली. या प्रस्तावावर अनेक टीएमसी आमदारांच्या सह्या बनावट होत्या. परवानगी न घेता बनावट सह्यांचं पत्र तयार केलं, असा आरोप करण्यात आला.

Mamata Banerjee news
सत्ता गेली आता पक्ष अन् चिन्ह जाणार? पश्चिम बंगालमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न'

बनावट सह्यांच्या पत्रावरून आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि आमदार संदीपन साहा यांनी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांच्याकडे तक्रार केली. ६ मे रोजी झालेल्या बैठकीत कोणताही ठराव मंजूर झाला नव्हता. तर प्रस्तावाच्या कागदपत्रांवर १४ आमदारांच्या बनावट सह्या होत्या, अशी तक्रार केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपन साहा यांच्यावर पक्षविरोधी कारवायाच्या आरोपाखाली पक्षातून काढून टाकलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com