

चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पक्षातील संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला.
तृणमूल काँग्रेससाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे
गेल्या दोन महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वर्तुळात वादळं मागून वादळ येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आधीच संकटाचा सामना करत असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांना या राजकीय वादळाचे धक्के बसत आहेत. आता आखणी एक मोठा धक्का ममता बॅनर्जी यांना बसला आहे. ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी असलेल्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनीही त्यांची साथ सोडलीय. चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसमधील आपल्या संघटनात्मक पदांचा राजीनामा दिलाय.
चंद्रिमा भट्टाचार्य यांनी दिलेला राजीनामा ममता बॅनर्जी यांच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना पत्राद्वारे आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. या पत्रात भट्टाचार्य यांनी सांगितलं की, त्या केवळ संघटनेतील आपल्या पदांवरूनच नाही तर पक्षाच्या 'साइनिंग ऑथॉरिटी'च्या (स्वाक्षरीचे अधिकार असलेल्या व्यक्तीच्या) भूमिकेतूनही त्यांनी राजीनामा देत आहे.
चंद्रिमा भट्टाचार्य या तृणमूल काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा राहिल्या आहेत. सरकार आणि संघटना या दोन्हीवर त्यांची मजबूत पकड होती, परंतु त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच तापलंय.
पश्चिम बंगालच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडलीय. रितब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील एका बंडखोर गटाने कोलकाता येथील ईएम बायपासवर असलेल्या 'तृणमूल भवन'चा ताबा घेतला आहे. प्रवेशद्वारावर नवीन पोस्टर्स लावण्यात आली असून, त्यावर ममता आणि अभिषेक यांचे फोटो देखील काढण्यात आली आहेत.
त्यांच्या जागी अरूप रॉय यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराला नवीन कुलूप लावण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच, कुणाल घोष हे कालीघाट गटातील इतर नेत्यांसह तृणमूल भवनात पोहोचले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि राजकीय हालचालींना वेग आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.