West Bengal Result: भाजपची उद्या तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब,शपथविधीचीही तारीख ठरणार?

BJP Win In West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये प्रचंड विजय मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. उद्या तातडीची बैठक बोलवली असून यात मुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा होणार आहे.
BJP Win In West Bengal Election
BJP leaders arrive for crucial meeting to decide West Bengal Chief Minister after historic victory.saam tv
Published On
Summary
  • बैठकीत विधीमंडळ नेता निवडला जाईल.

  • विधिमंडळ पक्षाचा नेता ठरणार

  • न्यूटाऊनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक आयोजित

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर भाजप अॅक्शन मोडवर आले आले. सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत, त्याबाबत उद्या मंगळवारी भाजपने बैठक बोलवली आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे. न्यूटाऊनमधील एका हॉटेलमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या सभेतून विधिमंडळ पक्षाचा नेता कोण असेल आणि पुढील सरकारचा मुख्यमंत्री कोण होईल, याचा निकाल लागणार आहे.

BJP Win In West Bengal Election
Tamilnadu Assembly Election Result : सर्वात मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांचा आपल्याच बालेकिल्ल्यात दारूण पराभव; कोणी मारली बाजी?

सूत्रांनुसार अमित शाह किंवा राजनाथ सिंह उद्याच्या बैठकीसाठी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. विजयी उमेदवारांना कोलकाता येथे बोलावले जाणार आहे. जिथे त्यांच्या उपस्थितीत विधीमंडळ नेत्याची निवड केली जाईल. अमित शाह किंवा राजनाथ सिंह उद्या नवनिर्वाचित आमदारांसोबत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा करतील अशी शक्यता आहे, मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून झाली नाहीये.

BJP Win In West Bengal Election
Maharashtra Politics: महायुती फुटणार, शिवसेना-भाजप वेगळे होणार? संजय शिरसाट यांच्या विधानाने खळबळ

बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

दरम्यान नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप ९ मे रोजी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजन करू शकते. ही तारीख वैशाख महिन्याची २५ तारीख असून तो एक शुभ दिवस मानला जातो. दरम्यान, भाजपच्या विजयानंतर नबन्ना येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

नबन्नासह सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केंद्रीय दले तैनात करण्यात आली आहेत. फायली घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाच्या येण्या-जाण्यावर बारकाईने लक्ष ठेवले जातंय. कोणत्याही व्यक्तीला फायली घेऊन बाहेर जाऊ देऊ नये,अशा सुचना सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान विजयानंतर पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. सत्ता स्थापन होताच भाजपचा अॅक्शन प्लॅन काय असेल याची माहिती दिली आहे.

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीतच आयुष्मान भारत योजनेला मंजुरी दिली जाईल. घुसखोरांवर कठोर कारवाईही केली जाईल, असं मोदी म्हणालेत. बंगालमध्ये आता बदला नाही बदल केला पाहिजे. सर्व पक्षांनी हिंसा सोडली पाहिजे.पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी पहिल्यांदाच बंगालमध्ये शांततेत निवडणुका पार पडल्या. एकाही निरपराध नागरिकाला आपला जीव गमवावा लागला नाही. बंगालच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला. आजपासून बंगाल भयमुक्त झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com