
नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे की, पुढील ७ दिवस पाऊस पाडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ वारे वायव्य राजस्थान आणि वायव्य उत्तर प्रदेशला कमी उष्णकटिबंधीय पातळीवर प्रभावित करत आहेत. याशिवाय, दक्षिण मध्य महाराष्ट्रपासून किनारी आंध्र प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाइन आणि कर्नाटक आणि आसाममध्ये चक्रीवादळ अभिसरण दिसून येत आहे. यामुळे, पुढील सात दिवस ईशान्य भारतात हलका ते मध्यम पडण्याची शक्यता आहे. या काळात ९ ते १२ जून दरम्यान, अरुणाचस प्रदेश, आसाम आणि मेघालयातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. ६ आणि ७ जून रोजी त्रिपूरामध्ये, ९ ते ११ जून दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपूरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनचा प्रवास मागील ९ दिवसांपासून रेंगाळलेला आहे. वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याने मान्सून एकाच जागेवर आहे. तर राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मान्सून २९ मेपासून एकाच जागेवर आहे. मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने वाटचाल झाली नाही तसेच पावसाचा जोरही कमी झाला. मान्सूनने आज पुढे प्रवास केला नाही. मान्सून आजही मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात होता.
त्यानंतर मान्सून पुढे सरकलाच नाही. मान्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. माॅन्सूनची वाटचाल कधी सुरु होईल, याविषयी हवामान विभागाने माहिती दिलेली नाही. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच पुढील ५ दिवस विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.