Shocking News : नेरुळमध्ये सोसायटीतील १८ सदस्यांवर गुन्हा दाखल, व्यावसायिकाच्या घरी जाऊन शिवीगाळ; नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai Crime News : आरोपींनी समाजमाध्यमांवर पीडिताविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसारित करून त्याचा मानसिक छळ सुरू ठेवला आणि त्याच्या सार्वजनिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
Threat to Navi Mumbai Businessman
Threat to Navi Mumbai BusinessmanSaam Tv News
Published On

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथील एका गृहनिर्माण सोसायटीमधील १८ सदस्यांविरोधात त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. एका ३७ वर्षीय व्यावसायिकाला धमकी देणे, बदनामी करणे आणि कट रचल्याच्या आरोपाखाली नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोसायटीच्या पुनर्विकासावरून झालेल्या वादानंतर करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी सांगितलं की, पीडित व्यक्ती त्या सोसायटीमध्येच राहत असून पुनर्विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत होता. काही दिवसांपूर्वी पीडिताच्या एका मित्राने सोसायटीच्या पुनर्विकासातील कथित गैरव्यवहार व पीडिताचे योगदान यावर एक लेख लिहून व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पीडित व्यक्तीची प्रतिमा उजळली आणि त्याला पाठिंबा मिळू लागला.

Threat to Navi Mumbai Businessman
Bhandara News : बॅडमिंटन खेळताना सेवानिवृत्त PSI अचानक खाली कोसळले, रुग्णालयात नेण्यापूर्वीच...; भंडाऱ्यात हळहळ

या पार्श्वभूमीवर, १ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:४५ वाजता घडलेल्या घटनेदरम्यान, पीडिताच्या लोकप्रियतेमुळे चिडलेल्या आरोपींनी त्याच्या घरी येऊन शिवीगाळ केली. 'ते पीडिताच्या दारावर जोरजोरात टकटक करत होते, अश्लील भाषेचा वापर करत होते आणि त्याला शारीरिक इजा पोहोचवण्याची धमकी देत होते. त्याच्या कुटुंबीयांनाही सोडणार नाही, अशी धमकी दिली,' असं संबंधित अधिकाऱ्यानं सांगितलं.

त्यानंतर या आरोपींनी समाजमाध्यमांवर पीडिताविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसारित करून त्याचा मानसिक छळ सुरू ठेवला आणि त्याच्या सार्वजनिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नेरुळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं. २०२३) अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सर्व आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून तपास सुरू आहे," असं नेरुळ पोलिसांनी सांगितलं. ही घटना पुनर्विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाचं आणि सामाजिक माध्यमांचा गैरवापर करून एखाद्याला लक्ष्य करण्याच्या प्रकारांचे गंभीर उदाहरण ठरते.

Threat to Navi Mumbai Businessman
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सुरु राहणार का? योजनेमुळे सरकार अडचणीत? एकनाथ शिंदेंनी सगळं सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com