Weather Update: देशभरात पावसाचा कहर; नद्या-नाल्यांना पूर, राजस्थान-पंजाबमध्ये १५ जणांचा मृत्यू

Weather Update : देशभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झालीय. हवामान खात्याने राजस्थान आणि दिल्लीच्या अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. नद्यांना आलेल्या पुरामुळे पंजाब आणि राजस्थानमध्ये वेगवेगळ्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झालाय.
Weather Update: देशभरात पावसाचा कहर; नद्या-नाल्यांना पूर, राजस्थान-पंजाबमध्ये १५ जणांचा मृत्यू
Weather Update
Published On

मुसळधार पावसामुळे दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांची स्थिती दयनीय झालीय. रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागात पाणी साचले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याआधी हवामान खात्यानेही दिल्लीत पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला होता.

संध्याकाळी दिल्ली आणि नोएडामधील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून देशभरात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे देशातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केलाय. पूर्व राजस्थानमध्ये रविवारी पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा आणि दिल्लीमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांची स्थिती दयनीय झालीय. रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागात पाणी साचले होते.

दिल्ली एनसीआरमध्ये ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोर धरलाय. रविवारी सकाळपासूनच दिल्ली-नोएडा आणि गाझियाबादमध्ये पाऊस सुरू झाला. पावसामुळे काही सोसायट्यांमध्ये वीज आणि पाण्याच्या समस्येनेही नागरिकांना हैराण झाले. अनेक भागात संपूर्ण रस्ते नद्या बनल्याने नागरिकांना पायी आणि वाहने चालणे कठीण झाले आहे.

मुसळधार पावासामुळे देशभरात अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आलाय. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. तर काही जागी नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे तुटून गेले आहेत. हवामान विभागने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १२ ऑगस्ट रोजी दिल्ली एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. तर १३ ऑगस्टपासून काही ठिकाणी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबमधील होशियारपूरच्या जैझमध्ये छोटी परसाती नदीत एक वाहन पडून ९ जणांचा मृत्यू झाला. एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी हे कुटुंब हिमाचल प्रदेशातील उना येथून पंजाबमधील एसबीएस नगर येथील गावात जात होते. पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी त्यांचे वाहन पुलावरून नेले , त्यावेळी पाण्याचा प्रवाहात कार वाहून गेली. राजस्थानमधील भरतपूरमधील बाणगंगा नदीच्या खाली असलेल्या नागला होट्टा (श्री नगर) गावात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली.

मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदी दुथडी भरून वाहतेय. नदीशेजारी बांधलेल्या बंधाऱ्यावर काही लोक उभे राहून नदीच्या पाण्याचा प्रवाह पाहत होते. प्रवाह पाहताना अचानक बंधाऱ्या वाहून गेला. यात काही जण नदीत पडले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बुडालेले लोक बाहेर येऊ शकले नाहीत. आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आलेत.

Weather Update: देशभरात पावसाचा कहर; नद्या-नाल्यांना पूर, राजस्थान-पंजाबमध्ये १५ जणांचा मृत्यू
Heavy Rain Alert : महाराष्ट्रासह 22 राज्यांना आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; वाचा कुठे कुठे कोसळणार पाऊस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com