Rain Alert: पुढील ४ दिवस महत्वाचे! विदर्भासह कोकणाला ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update Heavy Rain Alert Issued For 16 To 19 July: राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. १६ ते १९ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
Rain AlertSaam Tv
Published On

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केलाय. १६ ते १९ जुलै दरम्यान राज्यभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.१६ ते १९ जुलै या कालावधीत लक्षणीय पाऊस अपेक्षित आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आठवडाभर पडलेल्या पावसानंतर दोन दिवसांचा थोडासा दिलासा मिळालाय. मात्र, पुढील चार दिवस मुसळधार पाऊस परतणार आहे.

चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या २४ तासांत मुंबई आणि ठाण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला (Maharashtra Weather Forecast Update) आहे. १५ जुलैपर्यंत राज्यात सरासरीच्या १५ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडला. कोकण विभागात ३० टक्के आणि मध्य महाराष्ट्रात २२ टक्के पाऊस झालाय. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी मराठवाड्यात या मोसमात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

अलर्ट जारी...

हवामान खात्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, अमरावती, वर्धा आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी (Heavy Rain Alert) केलाय. गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. अनेक शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. याउलट, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये तब्बल आठवडाभरानंतर रविवारी सायंकाळी हलक्या सरी (Weather Update) बरसल्या.

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
Hingoli Heavy Rain : हिंगोलीच्या लोहरा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; पाझर तलाव फुटल्याने १० गावातील शेतीचे प्रचंड नुकसान

पुढील चार दिवस महत्वाचे

हवामान खात्याने मंगळवारी केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी (Rain Update) केलाय. १७ आणि १८ जुलैला उत्तराखंड, १८ जुलैला राजस्थान, १९ जुलैला ओडिशा आणि १८ आणि १९ जुलैला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय, उत्तर प्रदेश आणि इतर १९ राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्वाचे आहेत.

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
Amravati Rain: अमरावतीत मुसळधार पावसाचा कहर! नाल्याला पूर आल्याने १४ वर्षीय मुलगा गेला वाहून, वीज पडून दोन महिलाही जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com