Viral News : तुमचं एखाद्या तरुणीशी किंवा तरुणाशी ब्रेकअप झालं आणि असं झाल्यानंतर तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला तर? चकित झालात ना? पण एका तरुणासोबत असं घडलं आहे. या तरुणाने आपल्या ब्रेकअपची गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
प्रेयसीसोबत ब्रेकअप केल्यानंतर त्याला चक्क २५ हजार रुपये मिळाल्याचा दावा त्याने केला. प्रेयसीने आपली फसवणूक केल्यामुळे 'हार्टब्रेक इन्शुरन्स फंड' अंतर्गत ही रक्कम मिळाली असा दावा या तरुणाने केला आहे.
प्रेयसीने फसवणूक केली म्हणून मिळाले पैसे
प्रतीक आर्यन असे या तरुणाचे नाव आहे. त्याने एक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. प्रतीकने त्याच्या ट्वीटमध्ये सांगितले की, त्याच्या प्रेयसीने दोन वर्षांनंतर त्याची फसवणूक केली. त्यामुळे त्याला 'हार्टब्रेक इन्शुरन्स फंड'मध्ये जमा केलेले 25,000 रुपये मिळाले. प्रतीकचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)
अशी होती कल्पना
या तरुणाला आणि त्याच्या प्रेयसीला परस्पर संमतीने ब्रेकअपची परिस्थिती निर्माण झाली तर अशा स्थितीत 'हार्टब्रेक इन्शुरन्स फंड'ची कल्पना सुचली. याअंतर्गत दोघेही दरमहा ५०० रुपये एका जॉइंट अकाउंटमध्ये जमा करत होते. दोघांच्या नात्यात ज्याची फसवणूक होईल त्याला हे सर्व पैसे मिळतील असे दोघांनी ठरवले होते.
काय होता नियम?
प्रतीकने ट्वीटमध्ये लिहिले की, मला २५ हजार रुपये मिळाले कारण माझ्या मैत्रिणीने माझी फसवणूक केली. जेव्हा आमचे नाते सुरू झाले तेव्हा आम्ही प्रत्येक महिन्याला 500 रुपये एका संयुक्त खात्यात जमा करू लागलो आणि एक नियम केला की ज्याची फसवणूक होईल तो संपूर्ण पैसे घेईल. याला 'हार्टब्रेक इन्शुरन्स फंड' असे नाव देण्यात आले. (Viral News)
यूजर्सच्या भन्नाट कल्पना
प्रतीकच्या या ट्विटवर शेकडो यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, अद्भूत कल्पना आहे, तर दुसऱ्या एका यूजने लिहिले की, अशी बिझनेस आयडिया जोडप्यांमध्ये प्रथमच पाहिली. एका यूजरने विचारले की, एवढ्या पैशाचे काय करणार? आणखी एका यूजरने विचारले की, अशी योजना अस्तित्वात आहे का? अशा भन्नाट प्रतिक्रिया या ट्वीटवर येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.