Boxing Day Test: 'बॉक्सिंग डे कसोटी' नेमका विषय काय? का आणि कधी सुरू झाले सामने? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

क्रिकेटशी कसलाही संबंध नसलेला हा दिवस क्रिकेटमध्ये कसा आला, याची एक कथा आहे.
IND vs BAN 2nd Test/BCCI-Twitter
IND vs BAN 2nd Test/BCCI-TwitterSaam TV

Boxing Day Test: ख्रिसमस साजरा झाल्यानंतरच्या म्हणजेच २६ डिसेंबरचा दिवस जगभरात बॉक्सिंग डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्रीमंत लोकांनी गरीब आणि गरजुंना भेटवस्तूंचे बॉक्स द्यायचे अशी प्रथा १८ व्या शतकात सुरू झाली. त्यानंतर हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

या सुट्टीच्या दिवशी नोकर आपल्या मालकांच्या घरी जाऊन बॉक्समध्ये गिफ्ट घेवून येतं. इंग्लडमध्ये सुरू झालेल्या या प्रथेचा क्रिकेटशी कसा संबंध आला? बॉक्सिंग डे कसोटी हे नाव कसे पडले? काय आहे यामागचा इतिहास चला जाणून घेवू.

IND vs BAN 2nd Test/BCCI-Twitter
Lucknow: धक्कादायक! आईने मोबाईल काढून घेतला; ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय?

क्रिकेटमध्ये बॉक्सिंग डे कसोटीला (Test Cricket) विशेष महत्व आहे. क्रिकेटशी कसलाही संबंध नसलेला हा दिवस क्रिकेटमध्ये कसा आला, याची एक कथा आहे. १९५० साली मेलबर्न येथे पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एशेस मालिकेदरम्यान हा सामना झाला. मात्र, हा सामना २२ डिसेंबर रोजी सुरू झाला होता.

या सामन्याचा 5 वा दिवस बॉक्सिंग डे (26 डिसेंबर) रोजी आला होता. तेव्हापासून हे सामने सुरू झाले. 1980 पासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियन संघ सतत बॉक्सिंग डे कसोटी खेळत आहे. ऑस्ट्रेलियाशिवाय (Australia) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारख्या संघांनाही बॉक्सिंग डेच्या दिवशी सामने खेळायला आवडतात.

IND vs BAN 2nd Test/BCCI-Twitter
Aurangabad News: खर्चासाठी पैसे नाही, म्हणून फार्मसीच्या विद्यार्थ्याचे कारनामे; अखेर पोलिसांच्‍या ताब्‍यात

दरम्यान, क्रिकेटशिवाय इतरही अनेक खेळांमध्ये बॉक्सिंग डे सामने खेळवले जातात. काही देशांमध्ये, बॉक्सिंग-डे कसोटी व्यतिरिक्त, देशांतर्गत स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. यासोबतच अनेक वेळा इंग्लिश प्रीमियर लीग, स्कॉटिश प्रीमियर लीगचे सामने बॉक्सिंग डेवच्या दिवशीच झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com