Lucknow: धक्कादायक! आईने मोबाईल काढून घेतला; ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलाला अडवल्याने आत्महत्या केल्याची घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.
गेमिंग अ‍ॅपच्या नादी लागून अल्पवयीन मुलाने  केली आत्महत्या
गेमिंग अ‍ॅपच्या नादी लागून अल्पवयीन मुलाने केली आत्महत्याSaam Tv

Uttar Pradesh: लहान मुलांना लागलेले इंटरनेटचे वेड हा पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ऑनलाईन गेमिंग आणि इंटरनेटच्या अतिव्यसनाचा मुलांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. मात्र मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलाला अडवल्याने आत्महत्या केल्याची घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. (Uttar Pradesh)

गेमिंग अ‍ॅपच्या नादी लागून अल्पवयीन मुलाने  केली आत्महत्या
Aurangabad News: खर्चासाठी पैसे नाही, म्हणून फार्मसीच्या विद्यार्थ्याचे कारनामे; अखेर पोलिसांच्‍या ताब्‍यात

उत्तरप्रदेश मधील लखनऊमध्ये आईने गेम खेळण्यास अडवल्याने १० वर्षाच्या मुलाने गळफास घेत (Suicide) आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तरप्रदेशमधील हुसेनपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चितवापूरमध्ये ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर मुलाची आई कोमल मुलगा आरुष आणि विदिशासोबत आपल्या वडिलांच्या घरी राहत होती.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आरुष गेल्या काही दिवसांपासून शाळेत जात नव्हता. तो सतत मोबाईलवर गेम खेळत असायचा. याच रागातून आईने घटनेच्या दिवशी त्याला शाळेत जात नसल्यामुळे मारहाण केली आणि त्याचा मोबाईल काढून घेत कामानिमित्त बाहेर गेली.

गेमिंग अ‍ॅपच्या नादी लागून अल्पवयीन मुलाने  केली आत्महत्या
Cricket News: नववर्षात ग्रहण सुटणार का? टीम इंडियासाठी 2022 ठरले पराभवाचे वर्ष, 'हे' पाच पराभव लागले जिव्हारी

यावेळी रागात असलेल्या आरुषने बहिणीला खोलीबाहेर पाठवले आणि दार लावून घेतले. बराच वेळ झालातरी तो बाहेर आला नसल्याने बहिणीने दार वाजवले आवाज दिला मात्र कोणताच प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता आरुषने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने त्याला खाली घेतले असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

मुलाला मोबाईलचे अतिव्यसन लागले होते आणि आईने त्याचा मोबाईल काढून घेतल्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com