Cricket News: नववर्षात ग्रहण सुटणार का? टीम इंडियासाठी 2022 ठरले पराभवाचे वर्ष, 'हे' पाच पराभव लागले जिव्हारी

नव्या वर्षात टीम इंडिया नव्या उमेदीने, निश्चयाने मैदानात उतरेल पण त्याआधी लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागलेल्या या पाच पराभवाच्या मालिकांची चर्चा करावीच लागेल.
T20 World Cup Team India Cricket News Update / BCCI Twitter
T20 World Cup Team India Cricket News Update / BCCI TwitterSAAM TV
Published On

Year Ender 2022: २०२२ वर्ष हे भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत खराब राहिले. यावर्षी विश्वचषक उंचावेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती मात्र टीम इंडियाने सर्वांचीच निराशा केली. टी ट्वेंटी विश्वचषक असो किंवा वर्षाच्या शेवटी झालेला बांग्लादेश दौरा असो टिम इंडियाने सर्वच मोर्चांवर क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षांवर पाणी फिरवले.

हे वर्ष संपायला काही दिवसचं शिल्लक आहेत. नव्या वर्षात टीम इंडिया नव्या उमेदीने, निश्चयाने मैदानात उतरेल पण त्याआधी लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागलेल्या या पाच पराभवाच्या मालिकांची चर्चा करावीच लागेल.

T20 World Cup Team India Cricket News Update / BCCI Twitter
Tarak Mehta Birthday: कधीकाळी चॅनेलही मिळत नव्हता, आज लोकप्रियतेच्या शिखरावर; खळखळून हसवणाऱ्या तारक मेहताच्या निर्मितीचा रंजक प्रवास

वर्षाच्या सुरूवातीलाच टीम इंडियाने (Indian Team) हाताशी आलेला मोठा विजय गमावला. आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या पहिल्याच कसोटीत विजय मिळवत आघाडी घेतली होती. त्यामुळे पुढचे दोन सामने जिंकून मालिका खिशात घालण्याची मोठी संधी त्यांच्याकडे होती, मात्र त्यावेळी टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा वाद सुरू होता. याच वादात आणि अतिआत्मविश्वासात असलेल्या टीम इंडियाला पुढचे दोनही सामने गमवावे लागले, आणि मालिका 2-1ने गमवावी लागली.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर आणखी एक ऐतिहासिक विजयाची संधी टीम इंडियाकडे होती. जुलैमध्ये इंग्लड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली होती. त्यामुळे या मालिकेत भारताला विजयाची संधी होती. मालिकेतील पाचवी कसोटी कोरोनामुळे रद्द करण्यात आली, त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये एक विजय किंवा ड्रॉ करुन मालिका विजयाची संधी होती. मात्र यातही टीम अपयशी ठरली आणि मालिका 2-0 ने गमवावी लागली.

T20 World Cup Team India Cricket News Update / BCCI Twitter
Kalicharan Maharaj : धर्मासाठी खून कारणं काहीही वाईट नाही; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त विधान

त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात झालेल्या आशिया चषकातही पाकिस्तानशी कसाबसा विजय मिळवला. मात्र त्यानंतर पाकिस्तान, बांग्लादेशशी मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीही गाठता आली नाही. या स्पर्धेत विराट कोहलीने झळकावलेले शतक वगळता काहीही टीम इंडियासाठी समाधानाची बाब घडली नाही.

भारताला सर्वात मोठा धक्का ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० (World Cup) विश्वचषकाचा होता. मेलबर्नमध्ये पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आश्चर्यकारक विजय मिळवून कोहली आणि भारताने स्पर्धेत चांगली सुरुवात केली. यावेळी संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला, पण उपांत्य फेरीत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने 10 विकेट्सने धुलाई टीम इंडियाचा पराभव केला.

T20 World Cup Team India Cricket News Update / BCCI Twitter
Dhule News: दगडफेक करून भाविकांना लुटले; दरोडेखोर २४ तासात पोलिसांच्‍या ताब्‍यात

वर्षाचा शेवटही टीम इंडियाच्या पदरी पराभवचं पडला. बांग्लादेश दौऱ्यावर गेलेल्या संघाला पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यातच पराभव स्विकारावा लागला. शेवटचा सामना कसाबसा जिंकत संघाने क्लिनस्विपची नामुष्की टाळली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com