Viral Video : फायनान्सचे हप्ते थकले; कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरचं उचलून नेली बाईक; व्हिडिओ व्हायरल

संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हप्ते थकवले म्हणून चक्क दुचाकीवरच दुचाकी घेऊन गेल्याची घटना घडली.
Viral Video
Viral Video Saam tv
Published On

नवनीत तापडिया, डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati SambhajiNagar News: नो पार्किंगमध्ये किंवा चुकीच्या ठिकाणी गाडी पार्किंग केली किंवा फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्यानंतर गाडी जेव्हा संबंधित व्यक्ती घेऊन जातात. त्यास एखादी मोठी व्हॅन किंवा ट्रक असतो. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हप्ते थकवले म्हणून चक्क दुचाकीवरच दुचाकी घेऊन गेल्याची घटना घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

फायनान्स कंपन्या वसुलीसाठी अनेक शक्कल लढवतानाचा आपण बघितलेले आहे. वेळेत हप्ता न भरल्यास वाहन उचलून नेणे किंवा वाहन जप्त करणे अशा अनेक घटना आपण ऐकल्या असतील.

Viral Video
Sanjay Raut News: एकनाथ शिंदे आमच्याकडे परत येतील, पण आम्ही घेणार नाही...; संजय राऊतांनी कॉन्फीडन्समध्ये सांगितलं

परंतु छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील श्रीराम फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी हप्ता न भरल्याने चक्क दुचाकी चक्क दुचाकीवर ठेवून घेऊन गेल्याचा व्हिडिओ (Video) तुफान व्हायरल झाला आहे. वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील एक दुचाकीस्वार हप्ते भरत नसल्याने कर्मचाऱ्यांनी ही आयडिया अंमलात आणली.

फायनान्स कंपनीचे हप्ते बाकी असल्यानंतर फायनान्स कंपन्या वसुलीसाठी अनेक शक्कल लढवतात. छत्रपती संभाजी नगरात तर एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन भावंडाला गंभीर जखमी होईपर्यंत मारले होते.

दुचाकी-चार चाकीचे हप्ते वसूल करण्यासाठी मारहाण, शिवीगाळ केल्याचं अनेकदा समोर आलेलं आपण पाहिलंय. पण दुचाकीवरून वरून दुचाकी घेऊन जाण्याचा हा बहुतेक जगातला पहिलाच प्रसंग असावा.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) दुचाकी उचलून नेण्याऱ्या २ व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने दुचाकीचे हप्ते न फेडल्याने कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे. या कर्मचाऱ्यांनी थेट दुचाकीवरून शेतकऱ्याची दुचाकी उचलून नेली.

या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येत आहे. हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com