तमिळनाडूमध्ये नववे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच दोन आयएस अधिकाऱ्यांचे ट्रान्सफर केले आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला असून, प्रशासकीय वर्तुळात मोठा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूतील टीव्हीके सरकारने दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
डॉ. पी. सेंथिलकुमार (IAS) यांची अतिरिक्त मुख्य सचिव/सचिव-I म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच जी. लक्ष्मी प्रिया (IAS) यांची सचिव-II म्हणून मुख्यमंत्र्यांकडे बदली करून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी आदिद्रविड आणि आदिवासी कल्याण विभागात सचिव म्हणून कार्यरत होत्या.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर टीव्हीके (TVK) प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी ३ महत्त्वाचे निर्णय घेतला. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पुढच्याच काही मिनिटात विजय यांनी ३ निर्णायांवर स्वाक्षरी केल्या.
विजय यांनी कोणते ३ निर्णय घेतले?
१. २०० युनिट मोफत वीज पुरवठा.
२. अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना.
३. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष टास्क फोर्सची नियुक्ती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.