कोरोनापेक्षा भयंकर हंटा व्हायरस, हंटानं घेतला 3 नागरिकांचा बळी, (WHO) जागतिक आरोग्य संघटनेचा 12 देशांना अलर्ट

Hantavirus Global Alert 3 Deaths Who Warning: आता बातमी आहे तुमचं टेन्शन वाढवणारी... तुमच्या परिसरात जर उंदीर असतील तर सावधान... कारण कोरोनानंतर आता जगात एका जीवघेण्या व्हायरसचा शिरकाव झालाय. पाहूया एक रिपोर्ट..
Hantavirus outbreak raises global concern as WHO issues alert in multiple countries after deaths reported on a cruise ship.
Hantavirus outbreak raises global concern as WHO issues alert in multiple countries after deaths reported on a cruise ship.saam tv
Published On

कोरोनापेक्षाही धोकादायक आणि जीवघेण्या व्हायरसनं जगात धुमाकूळ घातलाय. हंटा असं या व्हायरसचं नाव आहे. अमेरिकेतल्या एका जहाजावर या व्हायरसचा शिरकाव झाला. 'एमव्ही होंडियस' नावाचे जहाज 1 एप्रिलला अर्जेंटिनामधून निघाले होते. अंटार्क्टिका आणि दक्षिण अटलांटिक महासागरातील बेटांवरून हे जहाज जात होते. जहाजावर 147 प्रवासी आणि कर्मचारी होते. ज्यात 23 देशांचे नागरिक होते. जहाजावर गंभीर श्वसनसंस्थेच्या आजाराची प्रकरणे आढळल्यावर ते केप व्हर्डे येथे लंगर टाकून थांबवण्यात आले. आतापर्यंत डच जोडपे आणि एक जर्मन नागरिक अशा तीन जणांचा मृत्यू झालाय. तर 8 संशयित रुग्ण आहेत. पूर्व युरोप दौऱ्यावरून परतलेल्या इस्रायलमधील एका नागरिकालाही या व्हायरसची लागण झालीय. जागतिक आरोग्य संघटनेने 12 देशांना रेड अलर्ट जारी केलंय. त्यामध्ये

12 देशांमध्ये 'हंटा'चा धोका !

कॅनडा

डेन्मार्क

जर्मनी

नेदरलँड्स

न्यूझीलंड

सिंगापूर

स्वीडन

स्वित्झर्लंड

तुर्की

यूके

अमेरिका

सेंट किट्स अँड नेव्हिस

या देशांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना त्वरित आणि योग्यरित्या केल्या गेल्या तर सध्या या रोगाचा प्रसार 'मर्यादित' राहील, अशी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस, प्रमुख, जागतिक आरोग्य संघटना दरम्यान हंटा व्हायरसचा प्रादुर्भाव नक्की कसा होतो पाहुयात

हंटा व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होता? (HEADER)

- व्हायरस प्रामुख्यानं उंदीर आणि घुशींमार्फत पसरतो

- उंदरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेवाटे व्हायरस वातावरणात सोडला जातो

- उंदरांच्या विष्ठेतील सुके कण हवेत मिसळतात

-दूषित हवेत श्वास घेतल्यानं व्हायरस थेट फुफ्फुसात प्रवेश करतो

- बंद घरं, जुनी कोठारं, पोटमाळा किंवा उंदरांचा वावर असणाऱ्या ठिकाणी संसर्गाचा सर्वाधिक धोका

या हंटा व्हायरसवर औषध उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. उंदरांना घरात येण्यापासून रोखणे, अन्न पदार्थ झाकून ठेवणे ही प्राथमिक काळजी घेणे गरजेचे आहे. सहा वर्षांपूर्वी कोरानाने जगात हाहाकार उडवला होता. लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. हंटाबाबत या 12 देशांमधून काय महिती समोर येते. ते पाहण महत्वाचं आहे. तो पर्यंत सर्वांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com