आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

श्रीनगर ते जम्मू दरम्यान धावणारी 'वंदे भारत एक्सप्रेस' पर्यटकांच्या पसंतीस उतरल्याने श्रीनगर रेल्वे स्थानकावर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या अत्याधुनिक रेल्वेमुळे येथील प्रवास अत्यंत वेगवान आणि सोयीस्कर झाला असला, तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
vande bharat srinagar to jammu travel chenab bridge
vande bharat srinagar to jammu travel chenab bridgesaam tv
Published On: 

मयूर राणे, साम प्रतिनीधी

श्रीनगर रेल्वे स्थानकावर स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे श्रीनगर ते जम्मू हा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद झाला आहे. मात्र, दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने श्रीनगर रेल्वे स्थानकावर भारतीय जवानांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची आणि बॉडीची कसून तपासणी केली जात आहे. त्यानंतरच प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

चिनाब रेल्वे पुलामुळे जम्मू-काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवी गती मिळाली असून, प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच पर्यटन आणि व्यापारालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

जम्मू-काश्मीरमधील रेल्वे प्रवासाला आता वेग आणि आधुनिकतेची नवी जोड मिळाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे श्रीनगर ते जम्मू हा प्रवास अधिक सोयीस्कर होत असल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचाही रेल्वे प्रवासाकडे मोठा कल पाहायला मिळत आहे. श्रीनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असून, स्थानक परिसरात मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

vande bharat srinagar to jammu travel chenab bridge
Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी केली जात आहे, तर बॉडी चेकिंगनंतरच प्रवाशांना आत प्रवेश दिला जात आहे. भारतीय जवानांकडून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

दुसरीकडे, ऐतिहासिक चिनाब रेल्वे पुलामुळे जम्मू-काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवी दिशा मिळाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवास अधिक सुलभ होत असून, जम्मू-काश्मीरच्या पर्यटनालाही याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एकीकडे आधुनिक रेल्वे प्रवासाचा अनुभव, तर दुसरीकडे सुरक्षेचा कडेकोट पहारा, असं चित्र सध्या श्रीनगर रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे.

vande bharat srinagar to jammu travel chenab bridge
सावधान! तुमचा कॉल डिटेल रेकॉर्ड विकला जातोय; पोलिसांचाच हात असल्याच्या दाव्याने खळबळ

वंदे भारत एक्सप्रेसमुळे श्रीनगर ते जम्मू हा प्रवास जलद झाला आहे. आम्ही सर्वप्रथम श्रीनगरमध्ये दाखल झालो, श्रीनगरची सफर केल्यानंतर जम्मूला जाण्याचा आणि त्याचवेळी ऐतिहासिक चिनाब रेल्वे पूल पाहण्याचा अनुभव घेण्याचं आम्ही ठरवलं. त्यासाठी आम्ही वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला. निसर्गरम्य परिसर, डोंगररांगा आणि ऐतिहासिक चिनाब रेल्वे पुलाचा अनुभव घेत हा प्रवास आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. विशेष म्हणजे, रस्तेमार्गे पाच ते सहा तास लागणारा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसमुळे अवघ्या तीन तासांत पूर्ण करता आला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाला चालना देण्यासोबतच प्रवाशांचा वेळ वाचवण्यातही या रेल्वेची महत्त्वाची भूमिका ठरत आहे.

वंदे भारत महाराष्ट्रातील पर्यटक वन टू वन

श्रीनगरहून माता वैष्णोदेवी स्थानकाकडे प्रवास करताना रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने पाहायला मिळाला. भारतीय जवानांचा वैष्णोदेवी स्थानकावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केवळ स्थानक परिसरातच नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेच्या प्रत्येक डब्यातही भारतीय जवान तैनात असल्याचं पाहायला मिळालं. जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील भागात रेल्वे प्रवास सुरक्षित राहावा, यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचं या बंदोबस्तातून स्पष्ट होतं. एकीकडे वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाला वेग मिळत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय जवान सज्ज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com