भाजप नेत्या आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीला अटक; राजकारणात खळबळ

Minister Rekha Arya Husband Girdhari Lal Sahu Arrested: उत्तराखंडच्या महिला आणि बालकल्याण मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू उर्फ पप्पू गिरधारी यांना झाशीमधून अटक करण्यात आली आहे.
MINISTER REKHA ARYA'S HUSBAND GIRDHARI LAL SAHU ARRESTED FROM JHANSI
MINISTER REKHA ARYA'S HUSBAND GIRDHARI LAL SAHU ARRESTED FROM JHANSIsaam tv
Published On: 

उत्तराखंड सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू उर्फ पप्पू गिरधारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. डेहराडून पोलिसांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथून ताब्यात घेतले आहे. पत्नीच्या तक्रारीवरून गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार होते. उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांकडून सातत्याने शोधमोहीम राबवली जात होती. अखेर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले आहे.

MINISTER REKHA ARYA'S HUSBAND GIRDHARI LAL SAHU ARRESTED FROM JHANSI
CAA Citizenship: कोणाला मिळणार भारताचं नागरिकत्व? CAA बाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

दरम्यान रेखा आर्य यांनी 15 ऑक्टोबर 2026 रोजी डेहराडूनमधील कॅन्ट पोलीस ठाण्यात पती गिरधारी लाल साहू यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी पतीवर छळ, फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि जीवे मारण्याचा कट रचल्यासारखे गंभीर आरोप केले होते. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीचीही स्थापना करण्यात आली होती.

MINISTER REKHA ARYA'S HUSBAND GIRDHARI LAL SAHU ARRESTED FROM JHANSI
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप; मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढला, २००० कोटी मंजूर

FIR दाखल झाल्यापासून पप्पू गिरधारी यांच्या अटकेसाठी पोलीस प्रयत्न करत होते. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील संभाव्य ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी करण्यात येत होती. दरम्यान, अटकेपासून बचाव करण्यासाठी गिरधारी लाल साहू यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. गिरधारी लाल साहू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी उत्तराखंड उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची आणि अटकेला स्थगिती देण्याची मागणी करणारी त्यांची याचिकाही फेटाळून लावली होती.

MINISTER REKHA ARYA'S HUSBAND GIRDHARI LAL SAHU ARRESTED FROM JHANSI
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तब्बल 31% इथेनॉल? सरकारच्या दाव्याने खळबळ|VIDEO

रेखा आर्य यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप

या प्रकरणात गिरधारी लाल साहू यांनीही पत्नी रेखा आर्य यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं होतं. आता पप्पू गिरधारी यांना झाशीमधून अटक करण्यात आल्यानंतर पोलीस तपासात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.