देशभरात विक्री होणाऱ्या पेट्रोलच्या गुणवत्तेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाची मर्यादा निश्चित असताना, प्रमुख तेल कंपन्या या मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉल मिसळत असल्याचा गंभीर आरोप कर्नाटक सरकारने केला आहे. कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री रिजवान अरशद यांनी प्रयोगशाळेच्या चाचणीचा अहवाल सादर करत हा दावा केला आहे. काही नमुन्यांमध्ये तब्बल 31.2 टक्क्यांपर्यंत इथेनॉल आढळल्याचा दावा सरकारने केला आहे. कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून इथेनॉल मिश्रणाबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याने राज्य सरकारने स्वतः पेट्रोलचे नमुने गोळा केले. राज्यातील 7 ते 8 जिल्ह्यांमधील पेट्रोल पंपांवरून एकूण 63 नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. NABL मान्यताप्राप्त श्रीराम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.